Maharashtra assembly election – मतदान केंद्रावरच उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, बीडमधील हृदयद्रावक घटना

Maharashtra assembly election – मतदान केंद्रावरच उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, बीडमधील हृदयद्रावक घटना

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान सुरू असतानाच बीडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मतदान सुरू असतानाच मतदान केंद्रावर उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बाळासाहेब शिंदे असे उमेदवाराचे नाव आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. आज मतदानाच्या दिवशी ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालय येथील मतदान केंद्रावर थांबले होते. मतदान सुरू असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले.

परळीतील धर्मापुरी मतदान केंद्रावर बोगस मतदान सुरू, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आरोप

मतदान केंद्रावर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले. तिथे नेल्यावर डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

परळीत राडा

दरम्यान, बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील परळी विधानसभा मतदारसंघात काही समाजकंटकांनी मतदान केंद्र फोडले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Exit Poll 2024 Results : मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट नाहीच? मराठा कुणाच्या बाजूने?; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते? Maharashtra Exit Poll 2024 Results : मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट नाहीच? मराठा कुणाच्या बाजूने?; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. दरम्यान मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप हा...
Exit Poll Results 2024 Maharashtra : मविआ आणि महायुतीतला मोठा भाऊ कोण? एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार जिंकणार? पाहा अंदाज
अजित पवार की शरद पवार? कोण पॉवर फुल्ल?, कुणाच्या वाट्याला किती जागा?; एक्झिट पोलने घाम फोडला
Maharashtra Exit Poll 2024 Results : राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष, दबदबा कायम? एक्झिट पोलने कुणाला धक्का?
Exit Poll Results 2024 : सत्ता परिवर्तनाला लाडक्या बहि‍णी आडव्या? योजनेचा महायुतीला फायदा? Exit Poll च्या आकडेवारीचा काय दावा
श्वेता तिवारी 8 वर्षांनी लहान अभिनेत्याशी केलं तिसरं लग्न? व्हायरल फोटोंमागचं सत्य काय?
मतदानासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली भारतात; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “हे खूपच दु:खद….”