इमान खलीफ पुरुषच! ऑलिम्पिक सुवर्ण पदक परत घ्या, हरभजन सिंगची मागणी
पॅरिस ऑलिंपिंकमध्ये महिला गटात सुवर्णपदक जिंकणारी अल्जेरियन बॉक्सर इमान खलीफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका वैद्यकीय अहवालात ती महिला नसून पुरुष असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यावर आता हिंदुस्थानी क्रिकेटपटू हरभजन सिंगने तिच्याकडून ऑलंपिक मेडल परत घेण्यात यावे, हे पूर्णपणे अन्यायकारक आहे, अशी मागणी करणारे ट्विट एक्सवर केले आहे. पेरिसमध्ये इमान खलीफला पहिल्या फेरिच्या एक मिनीटापूर्वी इटलीच्या एंजेला कॅरिनीने खेळातून माघार घेतली होती. त्याववरून बराच वाद निर्माण झाला होता.
एवढेच नाही, 2023 मध्ये बॉक्सिंग विश्व चॅम्पिअनशीपमध्ये अंतिम फेरित इमान खलीफ हिला अपात्र घोषित केले होते, कारण तिचे गुणसूत्र एक्सवाय सापडले होते. महिलेचे गुणसूत्र फक्त एक्स असतात. पॅरिस ऑलिम्पिंक दरम्यान एलन मस्क यांच्यासह अनेकांनी आवाज उठवला होता. त्यावेळी इमान खलीफने ऑनलाईन छळाची तक्रार दाखल केली होती. आता पुन्हा एक नव्याने वैद्यकीय अहवाल आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर हरभजन सिंहने तिच्याकडून सुवर्ण पदक परत घेण्याचे स्पष्ट केले आहे.
ओली लंदन नावाच्या एक्स अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, ऑलिम्पिकवाल्यांना वाटत होते की, तुम्ही विश्वास करा ही एक महिला आहे. इमान खलीफला महिलांना मारायचे आणि सुवर्ण पदक जिंकण्याची परवानगी देण्यात आली. जी लोकं अन्यायाविरुद्ध उभे राहिले त्यांना वर्णद्वेषी बोलले गेले, असे लिहीले आहे. आता वैद्यकीय अहवालात सिद्ध झाले की इमान खलीफ एक पुरुष आहे. त्यावर हरभजन सिंह याने लिहीले आहे की, ऑलिम्पिक सुवर्णपदक परत घ्या, हे अन्यायकाररक आहे. अशी एक्सवर पोस्ट शेअर करत मागणी केली आहे.
Take the Gold back @Olympics This isn’t fair https://t.co/ZO3yJmqdpY
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 5, 2024
रेडक्सच्या अहवालानुसार, लीक झालेल्या रिपोर्टमध्ये जून 2023मध्ये पॅरिसच्या क्रेमलिन -बिसेत्रे रुग्णालय आणि अल्झीयर्सच्या मोहम्मद लामिन डेबागिन रुग्णालयाच्या विशेष तज्ज्ञांकडून केला आहे. यामध्ये इमान खलीफच्या बायोलॉजीकल ट्रेटचे वर्णन केले. अहवालानुसार, हे इमान खलिफाच्या जैविक वैशिष्ट्यांचे वर्णन करते, जसे की अंतर्गत अंडकोषांचे अस्तित्व आणि गर्भाशयाचा अभाव. अहवालानुसार, एमआरआय अहवालात मायक्रोपेनिसची उपस्थिती सूचित होते, जी वाढलेल्या क्लिटॉरिससारखे दिसते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List