“मी त्यातून बाहेर पडू शकत नव्हतो कारण..”; कठीण काळाविषयी अर्जुन कपूरने सोडलं मौन

“मी त्यातून बाहेर पडू शकत नव्हतो कारण..”; कठीण काळाविषयी अर्जुन कपूरने सोडलं मौन

अभिनेता अर्जुन कपूरने रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं. गेल्या आठ वर्षांनंतर त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. अर्जुनच्या आयुष्यात हे यश बऱ्याच नकारात्मक टप्प्यांनंतर आलंय. एक वेळ अशीही होती जेव्हा अर्जुनने चित्रपट पाहण्याचंही सोडून दिलं होतं. अर्जुनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या इतर कलाकारांना इंडस्ट्रीत खूप चांगलं यश मिळत होतं. अशा वेळी मला असे ऑफर्स का मिळत नाहीत, असा प्रश्न त्याला पडायचा. या नकारात्मक काळात 2022 मध्ये अर्जुनने चित्रपट बघणंच सोडून दिलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन त्याच्या करिअरमधील त्या कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “हे काही रातोरात घडलं नाही. एखादा चित्रपट पूर्ण बघण्याचीही इच्छा माझ्यात नव्हती. मी पाच ते दहा मिनिटं एखादा चित्रपट बघायचो आणि मग मला प्रश्न पडायचा की मला असे ऑफर्स कधी मिळणार? मी इतरांचं काम बघत होतो. मी अशा लोकांपैकी आहे, जो इतरांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांची खुलून प्रशंसा करतो. पण तो काळ असा होता, जेव्हा मला कोणच्याच परफॉर्मन्समध्ये काहीच चांगलं दिसत नव्हतं. मी फक्त हाच विचार करत होतो की, मी असं काम का करू शकत नाही? मला अशा कामाची संधी का मिळत नाही? मला चांगले ऑफर्स मिळत नाहीयेत या विचारांमुळे माझ्या मनात कटुता निर्माण झाली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

“मी इतरांसोबत माझी तुलना करत नाही. मी असं म्हणत नाही की मी विजय वर्मापेक्षा चांगलं काम करू शकतो. माझं इतकंच म्हणणं आहे की जी भूमिका जयदीप अहलावत साकारत आहे, ती मी का करू शकत नाही? विजय वर्माला सध्या ज्या संधी मिळत आहेत, त्या मला का मिळू शकत नाहीत? या विचारांमुळे मला चित्रपट बघायलाही आवडत नव्हतं. माझं वैयक्तिक ओझं त्यात आड येत होतं. मी दररोज रात्री एक किंवा दोन चित्रपट बघून झोपायचो. पण या नकारात्मकतेमुळे मी 2022 च्या अखेरीस चित्रपट, सीरिज बघणंच सोडून दिलं होतं. मला त्यातून आनंदच मिळत नव्हता. मी बेडवर युट्यूब शॉट्स आणि इन्स्टाग्राम रिल्स बघत झोपून जायचो. मी माझ्याच नकारात्मक विचारांमधून बाहेर पडू शकत नव्हतो. मी खूप अतिविचार करू लागलो होतो”, अशा शब्दांत अर्जुन व्यक्त झाला.

अखेर अर्जुनने थेरपी सुरू केली. स्वत:वर पुन्हा प्रेम करण्याची गरज असल्याचं त्याला या थेरपीतून समजलं होतं. याविषयी तो पुढे म्हणाला, “कधी कधी तुमच्या प्रश्नांची उत्तरं बाहेर शोधायची नसतात, ती तुमच्यातच असतात. मलाही माझ्या प्रश्नांची उत्तरं माझ्यातच शोधायची होती. मी माझ्या वैयक्तिक गोंधळामुळेच अधू झालो होतो. आयुष्यातील त्या कठीण काळातून बाहेर पडण्यात सिंघम अगेन या चित्रपटाची खूप मदत झाली. मला चित्रपटाच्या सेटवर घरासारखं वातावरण जाणवू लागलं होतं. मला काम मिळत नव्हतं आणि रोहित सरांनी ही संधी दिली. सिंघम अगेनमधील खलनायकी भूमिका साकारताना मला खूप मजा आली.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाविकास आघाडीत CM कोण होणार? उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, थेट पक्का फॉर्म्युलाच सांगीतला महाविकास आघाडीत CM कोण होणार? उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, थेट पक्का फॉर्म्युलाच सांगीतला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रत्येक दिवशी नवनवीन मुद्दे समोर येतात. त्यात एक मुद्दा जास्त चर्चिला गेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी...
सूरज चव्हाणच्या आयुष्यातील खरा ‘बिग बॉस’ कोण?; अंकिताच्या व्हीडिओनंतर चाहत्यांना प्रश्न
“या दलदलीत मला पडायचं नाही..”; सूरजसोबतच्या वादावर अंकिताने स्पष्ट केली तिची बाजू
अमिषा पटेल 49 व्या वर्षी श्रीमंत उद्योजकाच्या मिठीत, फोटो तुफान व्हायरल, कोण आहे ‘तो’?
“माझ्याच ऑफिसमध्ये येऊन बोलणार की शक्तीमान..”; रणवीर सिंहवर का भडकले मुकेश खन्ना?
‘पुष्पा 2’मधील आयटम साँगसाठी श्रीलीलाला मिळालं इतकं मानधन; समंथापेक्षा 60% कमी फी
भ्रष्ट महायुती सरकार उलथवून टाका – शरद पवार