मतदान केंद्रावरील ’मोबाईल बंदी’ हटवा; हायकोर्टात जनहित याचिका दाखल

मतदान केंद्रावरील ’मोबाईल बंदी’ हटवा;  हायकोर्टात जनहित याचिका दाखल

मतदानाला जाताना मोबाईल जवळ बाळगल्यामुळे लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांना मतदान पेंद्रावरून मागे परतावे लागले होते. याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये या दृष्टिकोनातून मतदान पेंद्रावरील ’मोबाईल बंदी’ हटवा, वयस्कर मतदारांची होणारी प्रचंड गैरसोय टाळण्यासाठी मोबाईल जवळ ठेवण्यास परवानगी द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर बुधवारी, 13 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

मतदान पेंद्रांवरील मतदारांच्या गैरसोयीकडे लक्ष वेधत उजाला यादव यांनी अॅड. जगदीश सिंग यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान पेंद्रांच्या ठिकाणी मतदारांना मोबाईल जवळ असल्याच्या कारणावरून मतदान करण्यापासून रोखू नये. मतदारांना मोबाईल जवळ बाळगण्यास तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आणलेल्या ‘डीजीलॉकर अॅप’च्या माध्यमातून ओळखपत्र दाखवण्यास मुभा देण्यासाठी पेंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला निर्देश द्या, अशी विनंती जनहित याचिकेतून केली आहे. याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नियमित खंडपीठापुढे सुनावणी होणार असून त्यावर न्यायालय काय निर्णय देतेय याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मोबाईलला मनाई करणारी आयोगाची तरतूदच नाही

निवडणूक कर्मचारी मतदान पेंद्राबाहेर मतदारांकडील साहित्याची चाचपणी करतात. मोबाईल जवळ असलेल्या नागरिकांना बाहेरच रोखतात. वास्तविक, मतदान पेंद्राबाहेर मोबाईल ठेवण्यासंबंधी पेंद्रीय वा राज्य निवडणूक आयोगाने कुठेही तरतूद केलेली नाही. तरीही मतदान पेंद्राच्या गेटवर रोखले जात असल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतात, असे याचिकेत म्हटले आहे.

मतदारांच्या हक्कांचे उल्लंघन

प्रत्येक मतदार लोकशाहीचा भाग आहे. प्रत्येक मत हे लोकशाहीसाठी मोलाचे आहे. सध्याच्या डिजिटलच्या जमान्यात मोबाईल सर्वच ठिकाणी आवश्यक झालेला आहे. असे असताना मतदान पेंद्रांवर मोबाईलला मनाई करणे तसेच मतदारांना ‘डीजीलॉकर’ अॅपच्या माध्यमातून ओळखीच्या पुराव्यांची ‘सॉफ्ट कॉपी’ दाखवण्यास मुभा न देणे हे मतदारांच्या हक्कांचे उल्लंघन आहे, असा दावा जनहित याचिकेत करण्यात आला आहे.

याचिकेतील  इतर मुद्दे

मतदान पेंद्रांवर मोबाईलला मनाई केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिलांची प्रचंड गैरसोय होते. त्यांना मोबाईलअभावी आप्तजनांशी संपर्क न झाल्याने मतदान पेंद्रांवर जाता-येताना अडचणींना तोंड द्यावे लागते.

राज्य तसेच पेंद्र सरकारद्वारे अनेक अधिकृत कागदपत्रे ऑनलाईन जारी केली जातात. त्यात ओळखीच्या पुराव्यांचाही समावेश असतो. संबंधित कागदपत्रे योग्य पडताळणी करूनच ‘डिजिलॉकर’ अॅपच्या माध्यमातून जारी केलेली असतात. असे असताना मतदारांना ओळखीच्या पुराव्यांची मूळ प्रत हाती नसल्याच्या कारणावरून मतदान करू न देणे चुकीचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात
राज्य विधानसभा निवडणुकीत मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसंतसे नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे. अजितदादा यांच्या कालच्या स्फोटक मुलाखतीनंतर आता...
दुश्मन एकत्र येतात तर आम्ही का नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ, उद्धव ठाकरे यांना केले मोठे आवाहन
पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं; जुही चावलाची उडवली होती खिल्ली, सत्य जाणून तुम्हीही व्हाल भावूक!
Train Accident – तेलंगणातील पेड्डापल्लीमध्ये रेल्वे अपघात, 11 डबे रुळावरुन घसरले
Sunita Williams Health – माझी तब्येत ठिक…सुनीता विल्यम्सने तब्येतीबाबत दिली माहिती
गुजरातमधील रुग्णालयाचा प्रताप, आयुष्यमान योजनेच्या लाभासाठी 19 जणांची अँजिओप्लास्टी; दोघांचा मृत्यू
Video – उद्धव ठाकरे यांची तोफ धाराशिवमध्ये धडाडली