सिनेविश्व – छोटे चित्रपट, मोठी दिवाळी

सिनेविश्व – छोटे चित्रपट, मोठी दिवाळी

>> दिलीप ठाकूर

छोटय़ा चित्रपटांच्या निर्मितीत व्यावसायिक धोका कमी असतो ट्रेण्ड मल्टिप्लेक्स युगात आला आणि आता ओटीटीने ते स्थिरावलाही. म्हणूनच नामवंत कलाकारांनी आता चार पावले खाली उतरून छोटय़ा चित्रपटांतून काम करत बदलत्या काळाशी जुळवून घ्यायला हवे. छोटे चित्रपट कोणासाठीही थांबणारे नाहीत हे एकदा स्वीकारले की, बरीचशी गणिते आपोआप सुटतील. 

चित्रपटसृष्टीतील अनेक बदलांपैकी एक म्हणजे छोटय़ा चित्रपटांच्या निर्मितीत व्यावसायिक धोका कमी असतो हा रुळलेला ट्रेण्ड आहे. मल्टिप्लेक्स युगात त्याची ‘लागण’ झाली आणि आता ओटीटीने ते स्थिरावलेय.

मोठमोठे महागडे स्टार घ्या, वेगवेगळ्या देशांतील अनेक पर्यटनस्थळांवर मोठी चित्रीकरणे आयोजित करा, कलाकारांचे नखरे सहन करा, पूर्वप्रसिद्धीवर असा अफाट पैसा खर्च करा (की त्यातच एखादा समांतर अथवा चित्रपट महोत्सवातील चित्रपट निर्माण होईल), ओल्या पार्टीवर ऑनलाइन पेमेंट करा, दिमाखदार प्रीमियर करा म्हणजे यश हुकमी… असे काहीही नसते. ओटीटीवर जगभरातील अनेक भाषांतील कंटेंट ( कॉन्सेप्ट, थीम, गोष्ट) आज घरबसल्या पाहायला मिळतेय. त्याच्या स्पर्धेत टिकायचये तर ‘छोटे बजेट छोटा चित्रपट’ हे समीकरण उत्तम. देशातील एखाद्या शहरात घडणारी गोष्ट (आणि कधी त्याच शहरातील फायनान्सर) आणि दोन तासांचा चित्रपट. आटोपशीर पूर्वप्रसिद्धी, छोटासा प्रीमियर, समीक्षक व रसिकांना हा चित्रपट आवडला तर सोशल मीडियातून चर्चा, मल्टिप्लेक्समध्ये दोन-चार आठवडे मुक्काम आणि मग थेट ओटीटीवर. सगळा मामला फटाफट असे सध्या चित्र आहे. प्रवीण हिंगोनिया अभिनित व दिग्दर्शित नवरस कथा ‘कोलाज’ चांगलाच प्रतिसाद मिळवतोय, तर निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘वेदा’ची चर्चा होतेय. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’च्या यशाने शर्वरी वाघ स्टार झाली आणि ती कुठेही गेली तरी पाप्पाराझी तिच्यावर वेगाने फ्लॅश उडवतात.

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका ठरला आणि ओटीटीवर तो मोठय़ाच प्रमाणावर पाहिला जाऊ लागला. दिग्दर्शक रवी जाधवने  ‘मै अटल हूं’ या चरित्रपटाचे आव्हान पेलले (पण आपण पंकज त्रिपाठीच आहोत याचा पंकज त्रिपाठीने विसर पडू दिला नाही). ‘आर्टिकल 370’ ने दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे प्रकाशात आला. रणदीप हुडा अभिनित व दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ची विशेष दखल घेतली गेली. अपूर्वसिंग करकी दिग्दर्शित ‘भय्याजी’ हा मनोज वाजपेयीचा शंभरावा चित्रपट. यानिमित्त फ्लॅशबॅकमध्ये जाताना मनोज वाजपेयी थोडासा भावुक झाला. विकास बहेलचा ‘शैतान’, सुशी गणेशनचा ‘घुसपिठीया’, कुकी गुलाटीचा ‘विस्फोट’ अशी नावे वाढत जातात. गजेंद्र अहिरेच्या ‘सिग्नेचर’चा ट्रेलरच अस्वस्थ करतो आणि कधी एकदा हा चित्रपट पाहतोय असे वाटते. अनुपम खेरची एक कसदार भूमिका हेही विशेष.

असे अनेक चित्रपट ही आजची रसिकांचीही गरज आहे.  याचे कारण नामवंत कलाकारांचे सोशल मीडियात इतके नि असे दर्शन घडते की, त्यांना मोठय़ा पडद्यावर पाहण्याची उत्सुकता राहिलेली नाही. आता त्यांनीच चार पावले खाली उतरून अशा छोटय़ा चित्रपटांतून काम करत बदलत्या काळाशी जुळवून घ्यावे. त्यासाठी त्यांना आपली विशिष्ट प्रतिमेतच अडकून राहण्याची सवय सोडावी लागेल. नवीन दृष्टिकोनातून चित्रपट माध्यम व व्यवसायाचा विचार करणाऱया निर्माता व दिग्दर्शकाशी जुळवून घ्यावे लागेल.  छोटे चित्रपट कोणासाठीही थांबणारे नाहीत हे एकदा स्वीकारले की, बरीचशी गणिते आपोआप सुटतील. व्यावसायिक गणिते मात्र सुटताहेत तर मग आणखीन काय हवं? म्हटलं ना, छोटे चित्रपट म्हणजे जणू हुकमी दिवाळी. कदाचित आवाजी अॅटम बॉम्ब ठरणार नाहीत, पण लवंगी फटाका नक्कीच ठरला.

 [email protected]

(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात
राज्य विधानसभा निवडणुकीत मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसंतसे नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे. अजितदादा यांच्या कालच्या स्फोटक मुलाखतीनंतर आता...
दुश्मन एकत्र येतात तर आम्ही का नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ, उद्धव ठाकरे यांना केले मोठे आवाहन
पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं; जुही चावलाची उडवली होती खिल्ली, सत्य जाणून तुम्हीही व्हाल भावूक!
Train Accident – तेलंगणातील पेड्डापल्लीमध्ये रेल्वे अपघात, 11 डबे रुळावरुन घसरले
Sunita Williams Health – माझी तब्येत ठिक…सुनीता विल्यम्सने तब्येतीबाबत दिली माहिती
गुजरातमधील रुग्णालयाचा प्रताप, आयुष्यमान योजनेच्या लाभासाठी 19 जणांची अँजिओप्लास्टी; दोघांचा मृत्यू
Video – उद्धव ठाकरे यांची तोफ धाराशिवमध्ये धडाडली