‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 3’चा महाअंतिम सोहळा; कोण जिंकणार ट्रॉफी?

‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 3’चा महाअंतिम सोहळा; कोण जिंकणार ट्रॉफी?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद’च्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून सहा सर्वोत्तम स्पर्धकांनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या 9 आणि 10 नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे.

पुण्याचा देवांश भाटे आणि स्वरा किंबहुने, अहमदनगरचा सारंग भालके, यवतमाळची गीत बागडे, विरारची पलाक्षी दीक्षित आणि जुई चव्हाण या सहा जणांमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे. छोट्या उस्तादांना या पर्वात सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत, तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. या संगीत महारथींच्या सानिध्यात छोट्या उस्तादांवर गाण्याचे संस्कार झालेत त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल दैदीप्यमान असणार यात शंका नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

महाअंतिम सोहळ्यात छोटया उस्तादांना साथ देण्यासाठी अभिजीत सावंत, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, राधा खुडे खास हजेरी लावणार आहेत. सिद्धार्थ जाधव देखील या महाअंतिम सोहळ्यात धिंगाणा घालणार आहे. टॉप सहा स्पर्धकांमध्ये सुरांची महाजुगलबंदी देखील रंगणार आहे. यासोबतच स्टार प्रवाहच्या परिवाराच्या उपस्थितीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3’चा महाअंतिम सोहळा येत्या 9 आणि 10 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन ! हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन !
तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुमच्यासाठी रेग्युलर एक्सरसाईज गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे लोकांना 30 ते 60 मिनिटांचा व्यायाम करण्याचा...
मागाठाण्याचे उमेदवार उद्देश पाटेकर यांच्या नावे चुकीचं पत्र फिरवलं जातंय! – आदित्य ठाकरे
Photo – पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये नोरा फतेहीच्या सौंदर्यावर चाहते घायाळ
शिवतीर्थावरील सभेत त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकामं होतं! आदित्य ठाकरे यांचा मोदींना टोला
शिवसेनाप्रमुखांची मशाल हाती घ्या, तुमच्या मताने ही बेबंदशाही जाळून भस्म करून टाका; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
मिंधेच्या नगरविकास विभागात 74 कोटी रुपयांचा घोटाळा, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप
Video – बेबंदशाहीविरोधात मी लढाईला उतरलोय, मला साथ द्या; उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन