‘अनुपमा’वर सावत्र मुलीचे गंभीर आरोप, पतीने मांडली आपली बाजू; म्हणाला ‘माझ्या घटस्फोटामुळे..’

‘अनुपमा’वर सावत्र मुलीचे गंभीर आरोप, पतीने मांडली आपली बाजू; म्हणाला ‘माझ्या घटस्फोटामुळे..’

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्माने 2020 मध्ये लिहिलेली फेसबुक पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ईशाने रुपालीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले होते. आता चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ईशाची पोस्ट व्हायरल होत आहे. त्यावर ईशा आणि रुपालीचा पती अश्विन वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रुपाली गांगुलीने 2013 मध्ये अश्विन वर्माशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे. त्याआधी अश्विनचे दोन लग्न झाले होते. पहिल्या दोन लग्नातून त्याला दोन मुली आहेत. 2020 मध्ये अश्विनची मुलगी ईशाने फेसबुकवर पोस्ट लिहित रुपालीवर गंभीर आरोप केले होते. “रुपाली गांगुलीची खरी कहाणी कोणाला माहीत आहे का? तिचं अश्विन के. वर्माशी बारा वर्षांपर्यंत अफेअर होतं. त्यावेळी ते दुसऱ्यांदा विवाहित होते. अश्विन यांना पहिल्या दोन लग्नातून दोन मुली आहेत. रुपाली ही अत्यंत क्रूर मनाची महिला आहे. तिने मला आणि माझ्या बहिणीला दूर करण्याचा प्रयत्न केला. तिने आम्हाला आमच्याच वडिलांपासून दूर केलं”, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

या पोस्टमध्ये ईशाने पुढे म्हटलंय, “मी मीडियामध्ये असं सांगते की तिचं वैवाहिक आयुष्य खूप छान आहे. पण खऱ्या आयुष्यात तिचं त्यांच्यावर फार नियंत्रण आहे. मी जेव्हा कधी माझ्या वडिलांना फोन करायचे, तेव्हा ती ओरडायची. तिने मला आणि माझ्या आईला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तिने अश्विन यांच्या कुटुंबात आग ओतून आता स्वत: चांगलं वैवाहिक आयुष्य जगत असल्याचा दिखावा करणं अत्यंत चुकीचं आहे. रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतसोबत जसं केलं, तसंच रुपालीने केलंय. तिने माझ्या वडिलांना विचित्र औषधंसुद्धा दिली आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Verma (@eshav.official)

चार वर्षांनंतर ईशाची प्रतिक्रिया

रुपाली गांगुलीची सावत्र मुलगी ईशा आता 26 वर्षांची असून ती न्यू जर्सीमध्ये राहते. तिची पोस्ट पुन्हा व्हायरल होण्याबाबत ती म्हणाली, “होय, मी सोशल मीडियावर पाहतेय की माझी पोस्ट व्हायरल होत आहे. कोणीतरी त्यावर बोलत आहे, याचं मला समाधान आहे. माझं रुपालीसोबतचं नातं अद्याप ठीक नाही. आमच्यात काहीच नातं नाही. ती फक्त माझ्या भावाची आई आहे.”

ईशाने 2020 मध्ये पोस्ट लिहून रुपालीवर आरोप केल्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये तिने रुपाली आणि तिच्या वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. याविषयी स्पष्टीकरण देत ईशा म्हणाली, “माझे वडील आणि रुपाली मला त्यांच्या कुटुंबाचा भाग मानत नाही. पण माझं त्यांच्याशी नातं आहे, हे दाखवण्यासाठी मी तो फोटो पोस्ट केला होता. पाच वर्षांनंतर मी माझ्या वडिलांना भेटले होते. मी आठ वर्षांची असताना माझे वडील मला सोडून गेले होते. रुपालीने मला इन्स्टाग्रामवर फॉलो करणं आणि मला डिनरसाठी घेऊन जाणं हे तिचे सर्वांत अनपेक्षित प्रयत्न होते. ते माझे वडील आहेत, हे दाखवण्यासाठी मी तो फोटो पोस्ट केला होता.”

रुपालीच्या पतीचं स्पष्टीकरण

रुपालीसंदर्भातील ईशाची जुनी पोस्ट व्हायरल होताच तिचा पती अश्विनने स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट लिहिली आहे. “माझ्या आधीच्या नात्यातून मला दोन मुली आहेत. मी आणि रुपाली याबद्दल नेहमीच स्पष्टपणे बोललो आहोत. मी समजू शकतो की माझ्या छोट्या मुलीच्या मनात तिच्या पालकांच्या घटस्फोटाविषयी फार वेदना आहेत. घटस्फोटाचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो. पण संसार मोडण्यामागे अनेक कारणं असतात. माझ्या दुसऱ्या पत्नीसोबतच्या नात्यात बरीच आव्हानं होती. त्यामुळे आम्ही विभक्त झालो होतो. माझी पत्नी आणि माझी मुलं खुश राहावीत हीच माझी इच्छा आहे”, असं त्यांनी लिहिलंय.

वडिलांच्या या पोस्टवर ईशानेही प्रतिक्रिया दिली आहे. “ते असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की घटस्फोटामुळे मला त्रास झाला. पण त्यामागे बऱ्याच गोष्टी होत्या. तो सर्वसामान्य घटस्फोट नव्हता”, असं ती म्हणाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Name in voter list 2024 : मतदार यादीत तुमचे नाव आहे का? घर बसल्या असे झटपट चेक करा Name in voter list 2024 : मतदार यादीत तुमचे नाव आहे का? घर बसल्या असे झटपट चेक करा
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तुम्ही व्होट करायला जाण्याआधी तुमचे नाव मतदार यादीत आहे का...
मुंबईसह महाराष्ट्रात तापमानात सातत्याने चढ-उतार, हवामान खात्याचा काय?
यंदाच्या निवडणुकीत कोट्यवधींची मालमत्ता जप्त, निवडणूक आयोगाच्या पथकाची जबरदस्त कामगिरी
राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना गद्दार म्हटले? भर सभेत मागचं सगळं काढलं
एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है; विनोद तावडेंचा प्रति शाब्दिक हल्ला
“अर्जून कपूरच्या आठवणीत टल्ली…” रेस्टॉरंटमधून बाहेर आलेल्या मलायकाला चालता येईना, मित्राने सावरलं; नेटकऱ्यांकडून ट्रोल
रक्ताळलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल; बॉलिवूड अभिनेत्रीचा भिषण कार अपघात, सेलिब्रिटींकडून चिंता व्यक्त