संगमनेरमध्ये सुजय विखेंचा ‘गेम’

संगमनेरमध्ये सुजय विखेंचा ‘गेम’

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना आज मोठा झटका मिळाला. संगमनेरची जागा मिंधे गटाकडे गेल्याने सुजय विखेंचा पत्ता कट झाला.

गेल्या काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजपचे सुजय विखे पाटील यांनी शड्डू ठोकला होता. मात्र ही जागा मिंधे गटाकडे गेल्याने तिथून अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली.

बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे यांच्यात सुरू असलेल्या सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखेंना धक्का बसला. काही दिवसांपूर्वी धांदरफळ येथे सुजय विखेंच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत सुजय विखे व्यासपीठावर असताना वसंत देशमुख याने जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर संगमनेरचे वातावरण चांगलेच तापले. पेंद्रीय गृह मंत्रालयानेही याची दखल घेतली होती. राजकीय वर्तुळातही  मोठी टीका झाली. या सगळय़ा पार्श्वभूमीवर सुजय विखे यांना आज झटका मिळाला. नेवासामधून भाजपचे पदाधिकारी विठ्ठलराव लंघे यांना पक्षात घेऊन मिंधेंनी उमेदवारी दिली. मात्र तसा प्रयत्न विखे यांच्या बाबतीत झाला नाही. आता अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी सुजय विखे संगमनेरला जाणार की, वडिलांच्या प्रचाराला शिर्डीत थांबणार याकडे लक्ष लागले आहे. स्वपक्षाने विखे यांची काsंडी केल्याचे दिसून येतेय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा; संजय राऊतांचा हल्लाबोल सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा; संजय राऊतांचा हल्लाबोल
सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा; संजय राऊतांचा हल्लाबोल
“150 खोल्यांच्या पतौडी पॅलेसमध्ये आईची ती एक गोष्टच नाही..”; सैफ अली खानचा खुलासा
‘तुझ्यामुळे प्रत्येक दिवस…’; लेकीच्या वाढदिवसानिमित्त आलियाची भावनिक पोस्ट
सूरतमध्ये जिम आणि स्पा सेंटरमध्ये भीषण आग, दोन तरुणींचा होरपळून मृत्यू
वर्ध्यात स्टील फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत 22 कामगार जखमी
महाविकास आघाडीची गॅरंटी… महाराष्ट्राच्या विकासाची पंचसूत्री
महायुतीचा कोल्हापुरात फ्लॉप शो! शिंदे, फडणवीस, पवारांच्या सभेकडे जनतेची पाठ