IPL 2025 – जेम्स अँडरसनची पहिल्यांदाच मेगा लिलावात एन्ट्री, 1.25 कोटी बेस प्राईज!

IPL 2025 – जेम्स अँडरसनची पहिल्यांदाच मेगा लिलावात एन्ट्री, 1.25 कोटी बेस प्राईज!

Indian Premier League 2025 साठी लिलाव प्रक्रिया 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरबच्या जेद्दाह शहरामध्ये पार पडणार आहे. या मेगा लिलावासाठी 1574 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. चाहते सुद्धा या लिलावासाठी उत्सुक असून लिलाव प्रक्रियेची आतुरतेन वाट पाहत आहेत. अशातच इंग्लंडचा वेगवान माजी गोलंदाज जेम्स अँडरसनने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळण्याची उत्सुकता दर्शवत आपली दावेदारी जाहीर केली आहे.

जगातील मातब्बर वेगवान गोलंदाजांमध्ये इंग्लंडच्या 42 वर्षीय जेम्स अँडरसनच्या नावाचा समावेश केला जातो. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने अनेक तगड्या फलंदाजांचा त्रिफळा उडवला आहे. मात्र, आता हा इंग्लंडच्या पठ्ठ्या आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीची धार दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. 1.25 कोटी रुपये या मुळ किंमतीसह त्याने लिलावासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. परंतु जेम्स अँडरसन 2014 नंतर एकही टी-20 सामना खेळलेला नाही. तसेच आयपीएलमध्ये सुद्धा तो कधी खेळलेला नाही.

आयपीएलचं ठरलं, जेद्दाहला रंगणार लिलावाचा मेगा खेळ

जेम्स अँडरसनने जुलै 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्स स्टेडियमवर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला शेवटचा सामना खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अँडरसन इंग्लंड संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडत आहे. असे असताना जेम्स अँडरसनने IPL 2025 च्या लिलाव प्रक्रियेसाठी आपल्या नावाची नोंदनी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अँडरसनने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीमध्ये 19 सामन्यांमध्ये फक्त 18 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे मेगा लिलावात त्याला बोली लावण्यासाठी संघ मालक पुढाकार घेतील का नाही, हे 24 किंवा 25 तारखेला समजेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या