तरुणीवर बलात्कार; आठ नराधमांना दुहेरी जन्मठेप

तरुणीवर बलात्कार; आठ नराधमांना दुहेरी जन्मठेप

शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 11 आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी शिक्षा सुनावली आहे. यातील 8 आरोपींना दुहेरी जन्मठेप, तर तीन आरोपींना 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सचिन श्रीकांत राठोड, प्रवीण श्रीकांत राठोड, गणेश ऊर्फ अक्षय विष्णू चव्हाण, करण विजयकांत भरले, गौरव विलास भोसले, राज ऊर्फ राजकुमार सिद्राम देसाई, दिनेश परशु राठोड, सतीश अशोक जाधव, आनंद राम राठोड, रोहित शाम राठोड, चेतन राम राठोड अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. यात 4 रिक्षाचालक असून, आरोपी हे विजापूर रोडवरील प्रतापनगर, सोरेगाव, एस. टी. कॉलनी आरटीओ ऑफिसजवळ व निराळे वस्ती येथे राहणारे आहेत.

सोलापूर जिह्यात गाजलेल्या या खटल्याची हकीकत अशी की, पीडित मुलगी ही अल्पवयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेणारी आहे. तिची सचिन श्रीकांत राठोड (वय 24) या रिक्षाचालक तरुणाशी ओळख झाली होती. ओळखीनंतर त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. राठोड याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लॉजवर नेऊन बलात्कार केला. त्यानंतर राज देसाई या रिक्षाचालकाने रंगभवन येथून पीडित मुलगी घराकडे जात असताना तिला रिक्षातून नेऊन सार्वजनिक मैदानात तिच्यावर बलात्कार केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विक्रोळीत धगधगणार विकासकामांचीच मशाल विक्रोळीत धगधगणार विकासकामांचीच मशाल
>> दीपक पवार विक्रोळी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत शिवसेनेने प्रचंड विकासकामे केली आहेत. यावेळीही या विकासकामांचीच मशाल मतदारसंघात धगधगणार...
माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई थोडी होईल! भाजप उमेदवार प्रशांत बंब यांची मतदारांना धमकी
अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यातून ‘मुख्यमंत्री’ शब्द गायब! मिंध्यांच्या योजनेवर दादांची कुरघोडी
महाविकास आघाडीची गॅरंटी… महाराष्ट्राच्या विकासाची पंचसूत्री
महायुतीचे उमेदवार सुरेश धस तुतारीचा प्रचार करणार, अजित पवार गटाच्या मिटकरींचा दावा
जाहीरनाम्यात प्रिंटिंग मिस्टेक झाली, अजित पवार यांच्या जाहीरनाम्याची अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली
मुंबई आणि महाराष्ट्राचं गुजरातीकरण थांबवण्यासाठी जिंकावंच लागेल; उद्धव ठाकरे यांचा घणाघात