आमचे महाराष्ट्रातील जनतेला वचन, महायुतीप्रमाणे जुमलेबाजी नाही, पंचसूत्री राबवणारच; राहुल गांधी यांची घोषणा

आमचे महाराष्ट्रातील जनतेला वचन, महायुतीप्रमाणे जुमलेबाजी नाही, पंचसूत्री राबवणारच; राहुल गांधी यांची घोषणा

मुंबईतील बीकेसी येथे महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ झाली. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा ‘पंचसूत्री’ वचननामा जाहीर करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंचसुत्रीतील योजनांची घोषणा केल्या.

महिलांसाठीच्या महालक्ष्मी योजनेची माहिती देताना राहुल गांधी म्हणाले की, प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यावर 3 हजार रुपये खटाखट जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील महिलांना बस सेवा मोफत दिला जाईल. भाजप सरकारने महागाई वाढवली आहे. बेरोजगारी वाढवली आहे. एकीकडे भाजप , आरएसएस आणि दुसरीकडे इंडिया आघाडी आहे. एकीकडे आंबेडकरांचं संविधान आहे. समानता आणि प्रेम आहे. दुसरीकडे भाजप आणि आरएसएसचे लोक संविधानाला छुप्या पद्धतीने संपवू पाहात आहेत. समोरुन बोलत नाहीत. छुप्या पद्धतीने संविधानाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात, असा हल्लाबोलही राहुल गांधी केला.

असे सांगत त्यांनी महायुती आणि भाजपवर हल्लाबोल केला. देशात 15 टक्के दलित लोकसंख्या आहे. 8 टक्के आदिवासी आहेत. मात्र, मागासवर्गीयांची लोकसंख्या किती आहे? देशातील संस्था पाहिल्या तर तिथे दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय लोक दिसत नाहीत. त्यामुळे आम्ही म्हणत आहोत की, ऐतिहासिक निर्णय घेत जातीय जनगणना केली जावी. प्रत्येकाला समजले पाहिजे की, आपला वाटा किती आहे? ही लढाई विचारधारेची आहे.

महायुती सरकारने महाराष्ट्राचा चिखल केला. महाराष्ट्रला बरबाद केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, तेव्हाच यांचा भ्रष्टाचार महाराष्ट्रसमोर आला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पैसे देऊन हटवले गेले. उद्योगपतींची मदत करण्यासाठी सरकार हटवण्यात आले. धारावीची एक लाख कोटींची जमीन, गरिबांची जमीन तुमच्याकडून बळकावली जात आहे. एक लाख कोटींची जमीन तुमच्या डोळ्यासमोरुन एका अब्जाधीशाला दिली जात आहे. तुमचे उद्योगला गुजरातला नेले जात आहेत. टाटा एअर बस, आयफोन मॅनोफॅक्चरींग, गेल पेट्रो केमिकल प्रोजेक्ट हे उद्योग गुजरातला नेण्यात आले. अंबानी इथले सगळे घेत आहे. मात्र उद्योगपती रोजगार देऊ शकत नाहीत. उद्योगपती जमिनी बळकावू शकतात. रोजगार लघू-मध्यम उद्योग करणारे लोक देऊ शकतात. नोटबंदी आणि जीएसटी ही पॉलिसी नाही, छोट्या उद्योगपतींना संपवण्याचं काम आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वचन देत आहोत. महायुतीप्रमाणे जुमला देणार नाही. महायुती सरकारने महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवण्याचं काम केलं आहे. पेपर लीक करण्याचं काम केलं जात आहे. महाराष्ट्राच्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराला संपवण्याचं काम महायुती सरकार करत आहे, असा हल्लाबोलही राहुल गांधी यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा ‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा
महाविकास आघाडीची आज मुंबईतील बीकेसीत प्रचारसभा पार पडली. या सभेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख...
शेतकऱ्यांचं किती लाखांचं कर्ज माफ करणार?; शरद पवार यांची महागॅरंटी काय?
महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
जातीनिहाय जनगणना करू आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडू – राहुल गांधी
महिलांना महिन्याला 3 हजार रुपये खटाखट खटाखट देणार… बसमध्ये प्रवास फ्रि; राहुल गांधी यांनी दिली महागॅरंटी
मुंब्य्रात महाराजांचं मंदिर बांधण्याच्या फडणवीसांच्या आव्हानावर काय म्हणाले उद्धव ठाकरे
कोरोना काळात आम्ही धारावी वाचवली होती आता पुन्हा एकदा धारावी वाचवणार, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन