मतदानासाठी सुट्टी देणे सर्व आस्थापनांसाठी बंधनकारक

मतदानासाठी सुट्टी देणे सर्व आस्थापनांसाठी बंधनकारक

निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱयांना 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी देणे संबंधित संस्थांसाठी बंधनकारक राहील. या नियमांचे पालन न करणाऱया संस्थांविरोधात कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. मतदानाच्या या सुट्टीच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान चार तासांची सवलत देता येईल, परंतु यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. सुट्टी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने एखाद्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही गगराणी यांनी दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विक्रोळीत धगधगणार विकासकामांचीच मशाल विक्रोळीत धगधगणार विकासकामांचीच मशाल
>> दीपक पवार विक्रोळी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत शिवसेनेने प्रचंड विकासकामे केली आहेत. यावेळीही या विकासकामांचीच मशाल मतदारसंघात धगधगणार...
माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई थोडी होईल! भाजप उमेदवार प्रशांत बंब यांची मतदारांना धमकी
अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यातून ‘मुख्यमंत्री’ शब्द गायब! मिंध्यांच्या योजनेवर दादांची कुरघोडी
महाविकास आघाडीची गॅरंटी… महाराष्ट्राच्या विकासाची पंचसूत्री
महायुतीचे उमेदवार सुरेश धस तुतारीचा प्रचार करणार, अजित पवार गटाच्या मिटकरींचा दावा
जाहीरनाम्यात प्रिंटिंग मिस्टेक झाली, अजित पवार यांच्या जाहीरनाम्याची अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली
मुंबई आणि महाराष्ट्राचं गुजरातीकरण थांबवण्यासाठी जिंकावंच लागेल; उद्धव ठाकरे यांचा घणाघात