आम्ही चंद्रही आणून देऊ, हे आश्वासन द्यायचे राहिले; अमोल कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

आम्ही चंद्रही आणून देऊ, हे आश्वासन द्यायचे राहिले; अमोल कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

महायुतीतील अजित पवार गटाने त्यांचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना जबरदस्त टोला लगावला आहे. या जाहीरनाम्यात त्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. याबाबत बोलताना कोल्हे म्हणाले की, मला वाटते त्यांच्या जाहीरनाम्यात प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्यात एक ओळ छापायची राहून गेली की, आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ, असा टोला अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाला लगावला आहे.

महायुतीची ही आश्वासने केवळ पोकळ दावा आहे. सत्तेत येणार नाही, हे माहीत असल्याने, वाट्टेल ती आश्वासने द्यायची, हेच या जाहीरनाम्यातून स्पष्ट दिसते, असेही कोल्हे म्हणाले. यावेळी कोल्हे यांनी लाडकी बहिण योजनेवरूनही महायुतीवर चांगलाच निशाणा साधला. लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून आता बहीण त्यांची लाडकी झाली. लाडकी बहीण योजनेची घोषणा करताना, त्याची बजेटमध्ये तरतूद आहे का? हा प्रमुख प्रश्न आहे. तसेच स्थिती ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या पेन्शन योजनेची आहे. या योजनांना आमचा विरोध नाही. मात्र, वस्तुस्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे,असेही कोल्हे म्हणाले. अनेक योजनांचा निधी, हा ठराविक योजनांकडे वळवण्यात आला आणि सर्व योजना वाऱ्यावर सोडण्यात आल्या. काही जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचे जे आश्वासन देण्यात आले. ते तर हासयस्पद आहे. राज्याचे अर्थमंत्री एकाही जीएसटी परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. तर मग ते कोणत्या जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार आहेत, असा सवाल करत कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या