वर्ध्यात स्टील फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत 22 कामगार जखमी

वर्ध्यात स्टील फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत 22 कामगार जखमी

वर्ध्यात स्टील फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी उशिरा घडली. या स्फोटात 22 कामगार जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील इव्होनिथ स्टील फॅक्टरीमध्ये ही स्फोटाची घटना घडली. कंपनीत मेटल ऑक्साईड आणि सिलिकॉन डायऑक्साइड यांचे मिश्रण असलेल्या स्लॅगच्या कूलिंग प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाला.

स्फोटानंतर फॅक्टरीत भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले. स्फोटाचे नक्की कारण समजू शकले नाही. अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सदाभाऊंचं वादग्रस्त विधान, राऊतांचा फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, कानफाटात वाजवल्या पाहिजे… सदाभाऊंचं वादग्रस्त विधान, राऊतांचा फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, कानफाटात वाजवल्या पाहिजे…
देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफाटात वाजवली पाहिजे होती. पण तो फिदी फिदी हसत आहे आणि देवेंद्र फडणवीस...
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रंजक ट्विस्ट; अखेर एजे लीलाला देणार गृहलक्ष्मीचा मान
अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज करताच अशी होती अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया
लहान मुलांना वारंवार ताप का येतो? वैज्ञानिक कारण काय, मग काय कराल उपाय?
पुणे जिल्ह्यात साडेतीन कोटींची अवैध दारू पकडली, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई
कार्तिकी यात्रेसाठी आठ लाख बुंदी लाडू प्रसाद
पती-पत्नीचं ऑनड्युटी भांडण अन् रेल्वेला भुर्दंड, एक OK आणि तीन कोटीचं नुकसान