बायकोने घरातून हाकलले अन् त्याने चारजणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले; आता थेट तुरुंगात रवानगी…
सध्या देशपरदेशात एक्स्ट्रा मॅरेटीयल अफेअर आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अनेकजणांच्या प्रेमसंबंधांबाबत त्यांच्या पत्नीला किंवा कुटुंबियांनाही माहिती नसते. याचा उलगडा झाल्यावर त्यांना धक्का बसतो. तर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशीच अक घटना चीनमध्ये घडली आहे. सोशल मिडीयावर याची चर्चा होत आहे.
एका चिनी माणसाने एकाच इमारतीतील पाच वेगवेगळ्या महिलांसोबत प्रेमसंबंध ठेवत त्यांना तब्बल चार वर्षे फसवले. एकाच इमारतीत राहत असूनही त्याने सर्वांना अंधारात ठेवत स्वतःची ओळख लपवून ठेवली होती. आपल्या खऱ्या जोडीदाराबाबत त्याने कोणालाही थांगपत्ता लागू दिला नाही. तसेच त्याने श्रीमंत असल्याचा आव आणून त्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते.
जिओजुन असे या व्यक्तीचे नाव असून तो ईशान्य चीनच्या जिलिन प्रांताचा रहिवासी आहे. अशी माहिती साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. त्याचे प्रथम शिओजिया नावाच्या मुलीशी संबंध होते. शिओजियाला प्रभावित करण्यासाठी त्याने महागडे गिफ्ट्स दिले. यादरम्यान शिओजिया गरोदर राहिल्यामुळे त्याने शिओजियासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे लग्न झाल्यानंतर शिओजियाला पती जिओजुनचा खरा चेहरा समजला. तेव्हा तिने त्याला घरातून हाकलून दिले, पण तिने जिओजुनला घटस्फोट दिला नाही.
जिओजुनला घरातून हकल्यानंतरही तो शांत बसला नाही. यानंतर जिओजुनने त्याच इमारतीत राहणाऱ्या आणखी एका मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. आपल्या बोलण्यातून (1,40,000 युआन) म्हणजेच रु. 16.5 लाखाचे आमिष दाखवले. मात्र एवढ्यावरच न थांबता त्याने त्याच इमारतीतील आणखी तीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवले. आश्चर्याची बाब म्हणजे एकाच इमारतीत राहूनही कोणाला याबाबत माहिती नव्हती.
पुढील काही वर्षे हेच सुरू होते. मात्र हळूहळू यांच्यातील एका मुलीला जिओजुनच्या फसवणुकीचा अंदाज आला. एके दिवशी जिओजुनची पत्नी आपल्या मुलाला घेऊन कॉम्प्लेक्समध्ये फिरत होती. तेव्हा ती त्या जिओजुनच्या मैत्रिणींपैकी एका मैत्रिणीला भेटली. यावेळी त्यांच्या संभाषणात दोघांचा जोडीदार एकच असल्याचे त्यांना समजले. यानंतर अधिक चौकशी केली असता जिओजुन हा एकाच इमारतीतल पाच जणींची फसवणुक करत असल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांच्यातील एका मुलीने जिओजुनविरोधात पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला 14 लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि सर्व महिलांना त्यांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले. यासोबतच त्यांना साडेनऊ वर्षांची शिक्षाही झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List