महाराष्ट्र आर्थिक स्थितीत सहाव्या स्थानावर घसरला… 64 हजार महिला बेपत्ता; पवारांचा महायुतीवर हल्ला
महायुतीच्या सत्ताकाळात महाराष्ट्र आर्थिक स्थितीत देशात पहिल्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरला आहे. राज्यात तब्बल 64 हजार मुली आणि महिला बेपत्ता असून त्यांच्याबाबत सरकारकडून काहीही बोलले जात नाही. गुंतवणुकीतही राज्य मागे गेले असून बेरोजगारी, महागाईने जनता प्रचंड संकटात गेल्याने शिंदे-भाजप सरकारच्या काळात महायुती रसातळाला गेल्याचा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
राज्यात कायदा-सुव्यवस्था प्रचंड खालावली असून स्त्र्ायांवर अत्याचार वाढले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे. शिक्षणात एकेकाळी प्रगत असणारा महाराष्ट्र आता भ्रष्टाचारासाठी ओळखला जात आहे. सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यातही सरकारने भ्रष्टाचार केला. विशेष म्हणजे या पुतळ्याचे अनावरण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. हा खऱया अर्थान छत्रपती शिवरायांचा अवमानच असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी शरद पवार यांनी पंचसूत्रीमध्ये शेतकऱयांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी व नियमित कर्जफेडीसाठी 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन अशी घोषणा केली. देशातील सरकार शेतकऱयांकडे ढुंकूनही पाहत नाही मात्र आपले सरकार बळीराजाला वाचवणारे, महाराष्ट्राचे चित्र बदलणारे, सामान्यांच्या आयुष्यातील दुःख कमी करणारे, महिलांची सुरक्षा करणारे, दीन-दलीत-वंचितांना न्याय देणारे राहील, अशी गॅरंटीही पवार यांनी दिली.
मोदी झुठोंके सरदार खरगेंनी डागली तोफ
दहा वर्षांपूर्वी सत्ता मिळवण्यासाठी नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे वचन दिले. दोन करोड नोकऱया देणार, एमएसपी डबल करणार, नोटाबंदीनंतर शंभर दिवसांत सर्व काही सुरळीत करणार अन्यथा मला कोणत्याही चौकात सुळावर चढवा अशी वचने दिली. मात्र यातील एकही वचन मोदींनी तिसऱया वेळी पंतप्रधान झाल्यानंतरही पूर्ण केले नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी म्हणजे झुठोंके सरदार असल्याचा हल्ला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
सरकार पाडणाऱया चोरांना धडा शिकवण्याची वेळ
शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आरएसएसच्या तोंडातून कधी लोकशाही वाचवण्याचा विचार व्यक्त होत नाही. भाजपने गरीब, दलित, शेतकऱयांचे हित जपले नाही. फक्त जमिनी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत. अदानीला पोर्ट आंदण दिले. आमचे सरकार चोरी करून पाडले. अशा चोरांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे खरगे म्हणाले. मोदी जिथे हात लावतात ती वास्तू कोसळते असा टोला लगावताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या कामातील भ्रष्टाचारावर त्यांनी प्रहार केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List