AMAZON पार्सलमध्ये काय निघालं? पाहताच महिलेला आली उलटी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

AMAZON पार्सलमध्ये काय निघालं? पाहताच महिलेला आली उलटी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

सध्या ऑनलाइन शॉपिंग करण्यास लोक अधिक पसंती दर्शविताना दिसतात. अनेक चांगल्या ऑफर आणि वस्तूंच्या कमी किमतींमुळे ऑनलाइन शॉपिंग हा एक चांगला पर्याय असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. यातच ॲमेझॉनवरून वस्तू खरेदी करणं एका महिलेसाठी वाईट स्वप्न ठरलं आहे. जे तिला आयुष्यभर लक्षात राहील. ही महिला युकेमधील असून तिने ॲमेझॉनवरून एक सायकल हेल्मेट मागवलं होतं. मात्र पार्सलमध्ये असं काही निघालं की तिला पाहताच क्षणी उलटी झाली. याबद्दल जाणून तुम्हालाही धक्काच बसेल.

रॅचेल मॅकॲडम, असे या महिलेचे नाव आहे. रॅचेल आपल्या नवीन हेल्मेटची आतुरतेने वाट पाहत होती. पार्सल आल्यानंतर तिने ते घडलं, मात्र पुढे जे होणार होतं त्याची तिला कल्पना नव्हती. पार्सल उघडल्यानंतर तिला काहीतरी कुजण्याची दुर्गंधी आली. ज्यामुळे तिला उलट्या झाल्या.

तिने जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा त्यात हेल्मेट नव्हतं. बॉक्समध्ये ब्रेडचे तुकडे, तसेच उंदराची विष्ठा पसरलेली होती. महिलेने बॉक्स नीट पाहिल्यावर तिला त्यात एक छिद्र दिसलं. या छिद्रात पाहिलं असताना तिला तिथं एक कुजलेला व मेलेला उंदीर पडलेला आढळून आला.

या घटनेबाबत बोलताना महिलेने म्हटलं आहे की, “माझा विश्वासच बसत नव्हता. मला वाटलं की, मी बेशुद्ध पडणार आहे. हे सगळं पाहिल्यानंतर मी कशालाही हात लावला नाही. मी फक्त मागे हटले.”

मेलेला उंदीर आणि पार्सलची घाणेरडी अवस्था पाहून रॅचेल इतकी घाबरली की, ती रात्री जेवलीही नाही. या घटनेची तक्रार करण्यासाठी तिने ताबडतोब ॲमेझॉन ग्राहक सेवेशी संपर्क साधला. ॲमेझॉनने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि डिलिव्हरीमुळे झालेल्या गैरसोयीमुळे महिलेला तिचे संपूर्ण पैसे रिफंड केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या