अंधार, निराशा, वेदना आणि भिती! अभिनेत्री मनिषा कोयराला पहिल्यांदाच कॅन्सरवर मोकळेपणाने बोलली
बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोयराला हिने कर्करोगावर मात केली आहे. तिला 2012 साली गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. ती आपल्या आयुष्यातील कठिण काळाबाबत पहिल्यांदाच मोकळेपणाने व्यक्त झाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने त्या काळातील अनुभव सांगितला.
मनीषाने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ”2012 मध्ये मला कर्करोगाचे निदान झाले आणि तेही तो शेवटच्या स्टेजला असल्याचे कळले. सर्वसामान्यांप्रमाणेच ज्यावेळी नेपाळमध्ये कर्करोगाचे निदान झाल्यानंतर मी प्रचंड घाबरले होते. आम्ही जसलोक हॉस्पीटलमध्ये होतो. त्यावेळी दोन-तीन डॉक्टर आले, टॉप डॉक्टर आले आणि माझे त्यांच्याशी बोलणे झाले. त्यावेळी मला वाटले मी मरणाच्या दारात आहे, आयुष्य संपून गेल्यासारखे वाटले”.
मनीषा कोयराला पुढे म्हणाली, ”आम्ही दोन-तीन प्रसिद्ध व्यक्तींना ओळखत होतो. ज्यांनी न्यूयॉर्कला जाऊन उपचार घेतले होते. माझ्या आजोबांनीही न्यूयॉर्कमध्ये उपचार केले होते. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये 5 ते 6 महिने मी उपचार घेतले होते. माझ्या आईने महामृत्यूंजय पूजेसोबत नेपाळहून रुद्राक्ष घेतला होता. ते रुद्राक्ष डॉक्टरांकडे देऊन शस्त्रक्रियेवेळी तो सोबत ठेवण्याची विनंती केली होती. पण आईला ते नाही म्हटले नाही आणि त्यांनी ते सोबत ठेवले. तब्बल 11 तासानंतर ते म्हणाले रुद्राक्षाने चमत्कार केला”.
मनिषा बोलली, माझ्यावर केमोचा योग्य परिणाम होत होता. त्यांनी मला पंजाबी-अमेरिकन डॉक्टर विकी मक्कर यांच्याशी भेट घालून दिली. त्यांनी माझ्यावर उपचार सुरू केले आणि जगण्याची आशा दिली. या दरम्यान अनेकदा मी कोसळले. समोर अंधार, निराशा , वेदना आणि भिती सगळं काही एकत्र दिसत होते. मी बोलत राहायची, मनीषा तू बरी होत आहेस, औषधांचा तुझ्यावर परिणाम होत आहे. मनीषा पुढे बोलते, मला एक गोष्ट माहित होती, जर मला आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळाली तर त्याचा हिशोब मला चुकता करावा लागणार. कारण आयुष्याने मला बरेच काही दिले आहे. मला वाटले मीच होते जे सर्व काही उद्ध्वस्त केले. त्यामुळे आता मी सुधारू इच्छित होती. मी प्रार्थना केली की, मला आयुष्य नव्याने जगण्याची संधी मिळाली तर ती बेस्ट करेन. कारण मी माझ्या चाहत्यांना निराश केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List