सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावले; धारावी पुनर्वसन प्रकल्पास मालाड, अक्सामधील गावकऱ्यांचा तीव्र विरोध

सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावले; धारावी पुनर्वसन प्रकल्पास मालाड, अक्सामधील गावकऱ्यांचा तीव्र विरोध

धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी जमिनीचा सर्व्हे करण्याकरिता मालाड पश्चिम येथील अक्सा गावामध्ये आलेल्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आज गावकऱ्यांनी अक्षरशः हुसकावून लावले. यावेळी गावकरी प्रचंड आक्रमक झालेले दिसले.

धारावीचा पुनर्विकास अदानीमार्फत करण्यात येणार आहे. अपात्र धारावीकरांचे मालाडमध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय अलीकडेच राज्य सरकारने घेतल्याने मढ, भाटी, एरंगळ, अक्सा, मार्वे, मालवणी येथील स्थानिक गावकऱ्यांचा याला विरोध आहे. असे असतानादेखील धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी जमिनीचा सर्व्हे करण्याकरिता प्रशासनाचे अधिकारी आले होते.

स्थानिक आमदार अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हुसकावून लावले. त्यानंतर गावकऱ्यांना सोबत घेऊन अस्लम शेख यांनी थेट मालवणी पोलीस ठाणे गाठले.

भूमिपुत्रांच्या जमिनी अदानीच्या घशात जाऊ देणार नाही 

राज्यात आचारसंहिता लागू असताना पोलीस बंदोबस्तात  प्रशासनाचे अधिकारी जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी येतात आणि ग्रामस्थांवर दबाव टाकतात हे कितपत योग्य आहे. आमच्या कोळी बांधवांच्या जमिनी गिळंकृत करण्याचं षड्यंत्र रचलं जातंय, मात्र हे सरकारी षड्यंत्र मी कदापि यशस्वी होऊ देणार नाही. आशीष शेलार यांना जर हा प्रकल्प हवा असेल तर त्यांनी तो वांद्रय़ात घेऊन जावा, मात्र मी माझ्या भूमिपुत्रांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका अस्लम शेख यांनी मांडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विक्रोळीत धगधगणार विकासकामांचीच मशाल विक्रोळीत धगधगणार विकासकामांचीच मशाल
>> दीपक पवार विक्रोळी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत शिवसेनेने प्रचंड विकासकामे केली आहेत. यावेळीही या विकासकामांचीच मशाल मतदारसंघात धगधगणार...
माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई थोडी होईल! भाजप उमेदवार प्रशांत बंब यांची मतदारांना धमकी
अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यातून ‘मुख्यमंत्री’ शब्द गायब! मिंध्यांच्या योजनेवर दादांची कुरघोडी
महाविकास आघाडीची गॅरंटी… महाराष्ट्राच्या विकासाची पंचसूत्री
महायुतीचे उमेदवार सुरेश धस तुतारीचा प्रचार करणार, अजित पवार गटाच्या मिटकरींचा दावा
जाहीरनाम्यात प्रिंटिंग मिस्टेक झाली, अजित पवार यांच्या जाहीरनाम्याची अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली
मुंबई आणि महाराष्ट्राचं गुजरातीकरण थांबवण्यासाठी जिंकावंच लागेल; उद्धव ठाकरे यांचा घणाघात