पीडितेला कोणी धमकावले तर आम्ही आहोत, काळजी करू नका, हायकोर्टाने ठणकावले

पीडितेला कोणी धमकावले तर आम्ही आहोत, काळजी करू नका, हायकोर्टाने ठणकावले

बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातील पीडितेला कोणी धमकावले तर आम्ही आहोत. काळजी करू नका, असे उच्च न्यायालयाने बुधवारी ठणकावले. या गुह्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा व दोषी पोलीस अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य शासनाला दिले. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

पीडितेला धमकावले जाण्याची शक्यता आहे, असा दावा अ‍ॅड. अजिंक्य गायकवाड यांनी केला. पीडितेला कोणी धमकावत असेल तर पोलिसांत तक्रार करा. पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही तर आम्हाला सांगा, आम्ही योग्य ते आदेश देऊ. काळजी करू नका, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

दोषी पोलीस अधिकाऱ्यांचाही मुद्दा अ‍ॅड. गायकवाड यांनी उपस्थित केला. या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, असे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले. अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू असल्याने यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. याचा अहवाल आल्यानंतर आदेश दिले जातील, असे खंडपीठाने नमूद केले. यावरील पुढील सुनावणी सहा आठवड्यांनी होणार आहे.

काय आहे प्रकरण

बदलापूर येथील शाळेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. यात कारवाई होत नसल्याने स्थानिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत हे संपूर्ण प्रकरण सुओमोटो सुनावणीसाठी दाखल करून घेतले आहे.

पीडितेला इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश

पीडितेला इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरटीई कायद्यांतर्गत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीडितेला मनोधैर्य योजनेचे पैसे देण्यात आले आहेत, अशी माहिती महाधिवक्ता सराफ यांनी न्यायालयाला दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा; संजय राऊतांचा हल्लाबोल सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा; संजय राऊतांचा हल्लाबोल
सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा; संजय राऊतांचा हल्लाबोल
“150 खोल्यांच्या पतौडी पॅलेसमध्ये आईची ती एक गोष्टच नाही..”; सैफ अली खानचा खुलासा
‘तुझ्यामुळे प्रत्येक दिवस…’; लेकीच्या वाढदिवसानिमित्त आलियाची भावनिक पोस्ट
सूरतमध्ये जिम आणि स्पा सेंटरमध्ये भीषण आग, दोन तरुणींचा होरपळून मृत्यू
वर्ध्यात स्टील फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत 22 कामगार जखमी
महाविकास आघाडीची गॅरंटी… महाराष्ट्राच्या विकासाची पंचसूत्री
महायुतीचा कोल्हापुरात फ्लॉप शो! शिंदे, फडणवीस, पवारांच्या सभेकडे जनतेची पाठ