चेक बाऊन्स झाला, कांदा व्यापाऱ्याला चार महिने कारावासाची शिक्षा आणि सव्वाआठ लाखांचा दंड
सोलापूर येथील सिद्धेश्वर मार्केट यार्डातील कांदा अडत व्यापारी किशोर दत्तात्रय मडूर याला चेक बाऊन्स व फसवणूकप्रकरणी न्यायदंडाधिकारी डी. जी. कंखरे यांनी चार महिने कारावासाची शिक्षा व सव्वा आठ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सिद्धेश्वर मार्केटयार्डमधील कांदा व्यापारी किशोर दत्तात्रय मडूर यांनी 2020-21 या सालामध्ये मार्केट यार्डातील कांदा व्यापारी बिलाल अ. गफूर बागवान यांच्याकडून आठ लाख 9 हजार 94 रुपयांचा कांदा विकत घेतला होता. या व्यवहारप्रकरणी अडत व्यापारी मडूर याने रोख रक्कम न देता चेक दिला होता. परंतु, बँक खात्यात रक्कम नसल्याने दिलेला चेक बाऊन्स झाला.
चेक बाऊंस झाल्यामुळे सदरचे चेक बिलाल बागवान याने परत दिले. त्यानंतर रक्कम मागूनही न दिल्याने वकिलामार्फत नोटीस बजावण्यात आली. तरीही रक्कम न दिल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली. यात सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी व पुराव्यावरून न्यायदंडाधिकाऱयांनी अडत व्यापारी किशोर मडूर याला चार महिन्यांचा कारावास व 8 लाख 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात ऍड. इस्माईल शेख, सिराज शेख, एम. ए. इनामदार यांनी काम पाहिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List