पर्यावरणपूरक खण, पैठणी कापडातील आकाशकंदिलांची भुरळ

पर्यावरणपूरक खण, पैठणी कापडातील आकाशकंदिलांची भुरळ

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठेत यंदा पर्यावरणपूरक असे खण आणि पैठणी कापडातील आकाशकंदिलांचा झगमगाट पाहायला मिळत आहे.

रस्त्यावरच्या आकाशकंदिलांच्या स्टॉल्समुळे दिवाळीची चाहूल जाणवत आहे. दिवाळीची शोभा वाढवणारे वेगवेगळ्या आकारातील आणि आकर्षक रंगातील आकाशकंदील विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहेत. 500 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. दरवर्षी काहीतरी हटके शोधात नागरिक असतात. त्यामुळे आता नागरिकांना खण आणि पैठणीच्या कापडापासून तयार केलेले पारंपरिक आकाशकंदील भुरळ घालत आहे. तसेच यंदा छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री रामाच्या प्रतिमेचे आकाशकंदिलदेखील उपलब्ध आहेत. विविध रंगातील पैठणीच्या व खणाच्या कापडापासून बनविलेले पारंपरिक चौकोनी, षटकोनी आकाराचे आकाशकंदिल हे यंदा नवीनच असल्याने ग्राहकांचा खरेदीसाठी कल दिसून येत आहे. तसेच यातील छोट्या आकारातील डेकोरेशनसाठी लावण्यात येणारा आकाशकंदीलही उपलब्ध आहेत.

दरवर्षी असणारे बाजारातील आकाशकंदील

यामध्ये हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहे. रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोजन कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, मेटल स्टार, लोटस, फायरबॉल, झगमगते आकाशकंदील, विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक आकाराचे आकाशकंदील पाहायला मिळत आहेत. त्यात घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा, चांदणी, बॉल, पॅराशूट असे प्रकार आहेत. बांबूपासून तयार केलेले आकर्षक आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी आले आहेत. थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर टाळून केलेल्या पारंपरिक व पर्यावरणपूरक आकाशकंदील खरेदी करण्याकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. वेगवेगळ्या रंगातील आणि विविध आकारातील आकाशकंदिलांना मागणी वाढत आहे. छोटे छोटे आकाशकंदील डझनावर मिळत असून, दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत ते मिळत आहेत.

नावीन्यपूर्ण मायक्रॉन व बांबूच्या काड्यांचे आकाशकंदील

कागद आणि कापडाबरोबरच मायक्रॉन आणि बांबूच्या काड्यांपासून बनविलेले आकाशकंदील हे वेगळेपणा जपत आहेत. मायक्रॉनच्या रंगीबेरंगी धाग्यापासून सुरेख विणकाम केलेले आकाशकंदील लक्षवेधी ठरत आहेत. तर बांबूच्या काड्यांपासून तयार केलेले आकाशकंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा
कल आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, जिने अमेरिकेत केले मतदान, नसते केले तर हे रहस्य उलगडले नसते कोण आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, जिने अमेरिकेत केले मतदान, नसते केले तर हे रहस्य उलगडले नसते
बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना अमेरिका किंवा कॅनडा अशा देशाचे नागरिकत्व पत्करलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका केली जात...
ज्यांनी माझ्यावर शंका घेतली..; अर्जुन कपूरचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
करिश्मा कपूर दुसऱ्या लग्नासाठी सज्ज? वडिलांकडून मोठा खुलासा
ऐश्वर्याचं काय? अभिषेकबद्दलचा ‘तो’ व्हिडीओ डिलिट करताच नेटकऱ्यांचा अभिनेत्रीला सवाल
विमा कंपन्यांना झटका! LMV ड्रायव्हिंग लायसन्सधारक 7500 किलो वजनाची वाहने चालवू शकणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
थेट हल्ला करण्याची हिंमत नसल्याने संघ संविधानावर लपून हल्ला करते: राहुल गांधी
एक तारा जन्मला! फ्लोरिडातील विजयी रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांची एलॉन मस्कवर स्तुतीसुमने