रात्रीच्या जेवणात हलका-फुलका नाश्ता खाणे ठरू शकते फायदेशीर

रात्रीच्या जेवणात हलका-फुलका नाश्ता खाणे ठरू शकते फायदेशीर

दिवसभर काम केल्यानंतर रात्री घरी जाऊन काय जेवायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. झोमॅटो आणि स्विगीवर अनेक पर्याय उपलब्ध असतात. ते स्वयंपाक बनवण्याचा वेळ आणि कष्ट नक्कीच वाचवतात. परंतु काही काळानंतर त्यावरील पर्याय अंतहीन वाटू लागतात. त्यावरील अनेक पर्यांयामुळे निर्णय घेणे कठीण होते किंवा अशावेळी निर्णय घेण्याची क्षमता देखील नसते.

अशावेळी नाश्ता तुमचा तारणहार ठरू शकतो. होय, रात्रीच्या जेवणामध्ये नाश्ताचे पदार्थ खाल्ल्यास आरोग्यासंबंधित असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण होण्यास मदत होऊ शकते. सकाळी दिवसाची सुरूवात करण्यापूर्वी बऱ्याचदा कांदा, बटाटा, आणि शेंगदाण्यांनी भरलेले पोहे नाश्ता म्हणून खातात. हेच पोहे खाऊन दिवस देखील संपवू शकता. रात्रीच्या जेवणासाठी हलके फुलके नाश्त्याचे पदार्थ खाणे ही एक चांगली कल्पना असल्याचे आरोग्य तज्ञांनी म्हटले आहे, कारण ते शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.

मानवाचे आरोग्य योग्य आहार, व्यायाम, आणि पुरेशी झोप यावर अवलंबून असते. रात्रीच्या वेळेस जड पदार्थ खाल्ल्यास ते पचविण्यासाठी कठीण होते. त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. रात्रीच्या जेवणासाठी पौष्टिक, प्रथिनयुक्त आणि हलका नाश्ता घेण्याचा तज्ञ सल्ला देतात. उदाहरणार्थ, रात्री जड पराठे आणि पुरी खाणे टाळावे. केवळ जेवणामध्येच नाही तर नाश्त्याच्यावेळी देखील तेलकट, तळलेले आणि शुद्ध कार्बयुक्त पदार्थ महिन्यातून अधूनमधून खावे.

पारंपारिक रात्रीच्या जेवणाऐवजी हलका नाश्ता करणे फायदेशीर असते. नाश्ता बनविण्यासाठी लागणारे अनेक पदार्थ कमी खर्चिक असतात, तसेच नाश्ता बनविण्यासाठी वेळ देखील कमी लागतो. इडली, डोसा, पोहे, उपमा, दलिया, ऑम्लेट आणि पनीर किंवा डाळ छिला अशा प्रकारचे पदार्थ पचण्यासाठी हलके असतात. ते प्रथिने, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांनी भरपूर असतात, त्यामुळे नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणासाठी ते योग्य पर्याय ठरतात.

उच्च चरबीयुक्त किंवा जास्त साखर असलेले पदार्थ खाणे टाळावे. नाश्ता आणि रात्रीच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि हेल्थी फॅट्स यांचा समावेश असावा. विशेषत: स्नायूंच्या दुरूस्तीसाठी व चयापचयाला मदत करेल अशा प्रथिने आणि जटिल कार्बोदक असलेले पदार्थ खाण्याला महत्व देणे गरजेचे आहे.

संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार, संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी महत्वाचा असतो. रात्रीच्या जेवणाऐवजी नाश्ता करणे, पौष्टिक अन्न खाणे, जंक फूड आणि बाहेरील अन्न पदार्थ खाण्याचे टाळल्यास आरोग्य सदृढ राहण्यास मदत होते. कामाच्या वेळापत्रकासोबतच आहाराचे वेळापत्रकही आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी महत्वाचे असते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘…तेव्हा सर्वात आधी गाडी घेऊन जाणारा मी होतो, मी कुटुंबात कधी…’, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं ‘…तेव्हा सर्वात आधी गाडी घेऊन जाणारा मी होतो, मी कुटुंबात कधी…’, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाऊ उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. राज ठाकरे यांची दादर माहीम मतदारसंघात मनसे...
राष्ट्रसंतांच्या भूमीत योगींची भाषा विष पेरणारी; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश, मुख्य शूटर शिवकुमार गौतमला अटक
‘तुमची त्यांना भीतीच उरली नाही’, बेधडक राज ठाकरेंचं अत्यंत कळकळीचं भाषण
मोठी बातमी! धारावीत काँग्रेस-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, अनेक जण जखमी झाल्याची माहिती
चालल्यानंतरही वजन कमी होत नसेल तर ‘या’ चुका टाळा
मशाल अशी पेटून धगधगू द्या की, भ्रष्टाचाऱ्यांच्या बुडाला आग लागली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची गर्जना