Category
Lok Sabha
पुणे  राजकीय 

‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’साठी पाठपुरावा करणार! 

‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’साठी पाठपुरावा करणार!   पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’चा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेकदा बैठक झाली. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती. पण, हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार होतील. त्यामुळे  ‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’ करण्यासाठी आम्ही पुन्हा संरक्षण विभाग आणि प्रधानमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत आणि हा प्रश्न सोडवणार आहोत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 
Read More...
पुणे  राजकीय 

“भविष्यात निवडणूक लढेल की नाही, पण यावेळेला एक संधी द्या”, आढळराव पाटलांकडून मतदारांना भावनिक साद

“भविष्यात निवडणूक लढेल की नाही, पण यावेळेला एक संधी द्या”, आढळराव पाटलांकडून मतदारांना भावनिक साद महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा उद्या थंडवणार आहेत. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. भविष्यात निवडणूक लढेल की नाही, सांगता येत नाही. परंतु यावेळी मला काम करण्याची संधी द्या. जी कामे अपुर्ण राहिली आहे. ती पुर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद द्या. असे आढळरावांनी एका सभेत म्हटलंय.
Read More...
पुणे  राजकीय 

“वेळ पडल्यास अभिनयातून ब्रेक घेणार,” त्यामुळेच कोल्हेंनी केलं असं विधान

“वेळ पडल्यास अभिनयातून ब्रेक घेणार,” त्यामुळेच कोल्हेंनी केलं असं विधान लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळमधून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावली आहे. त्यातच, उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर मतदारसंघात पाच वर्षे फिरकले नसल्याची वांरवार टीका केली जातेय. त्यामुळे काहीसे बॅकफूटवर आलेल्या कोल्हे यांनी वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ, असं म्हटले आहे.
Read More...
पुणे  राजकीय 

‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावू’; उपमुख्यमंत्री अजित पवार

‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावू’; उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. या मतदानाला आता अवघे २ दिवस बाकी असल्याने प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
Read More...
पुणे  राजकीय 

भोसरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा

भोसरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत उद्या (दि.१० मे) भोसरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  ‘विजयी संकल्प’ सभा होणार आहे. त्यानिमित्ताने महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तोफ धडाडणार आहे.
Read More...
पुणे  राजकीय 

'सुप्रियाताई चतुर्थीला अन् अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात'; मिटकरींचा हल्लाबोल

'सुप्रियाताई चतुर्थीला अन् अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात';  मिटकरींचा हल्लाबोल शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 2018 साली मी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसंपर्क यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र ढवळून काढला होता. मला मी त्यांच्या सोबत आहे यांचा प्रचंड अभिमान होता. मात्र हा व्यक्ती केवळ पैशाचा मागे लागलेला आहे, छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांची भूमिका करून त्यांना महाराजांचे विचार समजत  नाहीत, उद्या पैशांसाठी ही व्यक्ती बहलोल खानाचीही भूमिका करेल अशी जहरी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली. 
Read More...
पुणे  राजकीय 

“बिनकामाच्या खासदाराला आता घरी बसवा”, आढळरावांची सडकून टिका

“बिनकामाच्या खासदाराला आता घरी बसवा”, आढळरावांची सडकून टिका चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा मंतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी  लढत आहे. शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे माझ्यावर टीका करतात की, मी पालकमंत्री असताना त्यांनी माझ्याकडे मतदारसंघासाठी निधी मागितला; मात्र मी दिला नाही असे ते खोटे बोलत आहेत. त्यांना मतदारसंघापेक्षा मालिकेचे शूटिंग महत्वाचे आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांना चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता आला नाही, वाहतूक कोंडीत लोकांचे दोन दोन तास वाया जात आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आढळराव पाटील यांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले.
Read More...
पुणे  राजकीय 

‘याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना’; अजित पवार

‘याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना’; अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे.
Read More...
पुणे  राजकीय 

अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संघटनेकडून आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र

अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संघटनेकडून आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विविध संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे. अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. महासंघाचे संस्थापक प्रल्हाद गुळाभिले यांच्या सूचनेवरून हा पाठिंबा देण्यात आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश लोकसभा प्रभारी अनिल ताके पाटील यांनी नमूद केले.
Read More...
पुणे  राजकीय 

शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद

 शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज त्यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव यांनी हडपसर मतदार संघात विविध ठिकाणी भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता हडपसर विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव अढळराव पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळेल, असा विश्वास माधुरी आढळराव यांनी व्यक्त केला.
Read More...
पुणे  राजकीय 

Shirur Lok Sabha Election: बैलगाडा शर्यत बंदी उठवली-कायदा केला; म्हणून महायुतीला देऊया साथ..! 

Shirur Lok Sabha Election: बैलगाडा शर्यत बंदी उठवली-कायदा केला; म्हणून महायुतीला देऊया साथ..!  महाराष्ट्राची शेती-माती- संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला. बंदी उठवली आणि कायदा पारित केला. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह ग्रामीण महराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयात हा लढा यशस्वी झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. 
Read More...
पुणे  राजकीय 

तुम्ही साहेबांचे सैनिक, वळसे साहेबांचा तुमच्यासाठी निरोप आलाय, आढळरावांना विजयी करा

तुम्ही साहेबांचे सैनिक, वळसे साहेबांचा तुमच्यासाठी निरोप आलाय, आढळरावांना विजयी करा महायुतीतील अजित पवार गटातील बारामती, रायगड आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. अशातच हे सर्व झाल्यानंतर अजित पवार गट आता आपला मोर्चा शिरूरकडे वळविणार आहेत. अशातच महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी आता अजित पवार गट चांगलाच कामाला लागला आहे. अशातच शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटील हे देखील सक्रीय झाले असून त्यांनी देखील मतदारांना आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच दिलीप वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे पाटलांनी देखील वळसे पाटलांना निरोप घेऊन घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
Read More...

Advertisement