Category
Shivajirao Adharao Patil
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %> Read More... <%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... “वेळ पडल्यास अभिनयातून ब्रेक घेणार,” त्यामुळेच कोल्हेंनी केलं असं विधान
Published On
By Manisha Thorat- Pisal
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळमधून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावली आहे. त्यातच, उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर मतदारसंघात पाच वर्षे फिरकले नसल्याची वांरवार टीका केली जातेय. त्यामुळे काहीसे बॅकफूटवर आलेल्या कोल्हे यांनी वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ, असं म्हटले आहे.
Read More... “बिनकामाच्या खासदाराला आता घरी बसवा”, आढळरावांची सडकून टिका
Published On
By Manisha Thorat- Pisal
चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा मंतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे माझ्यावर टीका करतात की, मी पालकमंत्री असताना त्यांनी माझ्याकडे मतदारसंघासाठी निधी मागितला; मात्र मी दिला नाही असे ते खोटे बोलत आहेत. त्यांना मतदारसंघापेक्षा मालिकेचे शूटिंग महत्वाचे आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांना चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता आला नाही, वाहतूक कोंडीत लोकांचे दोन दोन तास वाया जात आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आढळराव पाटील यांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
Read More... अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संघटनेकडून आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र
Published On
By Manisha Thorat- Pisal
महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विविध संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे. अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. महासंघाचे संस्थापक प्रल्हाद गुळाभिले यांच्या सूचनेवरून हा पाठिंबा देण्यात आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश लोकसभा प्रभारी अनिल ताके पाटील यांनी नमूद केले.
Read More... तुम्ही साहेबांचे सैनिक, वळसे साहेबांचा तुमच्यासाठी निरोप आलाय, आढळरावांना विजयी करा
Published On
By Manisha Thorat- Pisal
महायुतीतील अजित पवार गटातील बारामती, रायगड आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. अशातच हे सर्व झाल्यानंतर अजित पवार गट आता आपला मोर्चा शिरूरकडे वळविणार आहेत. अशातच महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी आता अजित पवार गट चांगलाच कामाला लागला आहे. अशातच शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटील हे देखील सक्रीय झाले असून त्यांनी देखील मतदारांना आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच दिलीप वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे पाटलांनी देखील वळसे पाटलांना निरोप घेऊन घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
Read More... विद्यमान खासदार ‘पार्टटाइम राजकारणी..’; आढळराव पाटलांचा कोल्हेंना खोचक टोला
Published On
By Manisha Thorat- Pisal
गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता काही दिवसात थंडावणार आहेत. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचारात चांगलाच जोर घेतला आहे. अशातच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आढळराव पाटलांनी कोल्हेंवर जोरदार टिका केली आहे.
Read More... '...अन्यथा कोल्हेंनी जाहीर माफी मागून निवडणूकीतून बाहेर पडावे'; आढळरावांनी कोल्हेंना खडसावले
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिरूर लोकसभा मतदारसंघात सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे तीन महिन्यांपासून कांदा कांदा ओरड करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंचा हा मुद्दाच सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे ते सैरभैर होऊन, देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी पोरकट भाष्य करू लागले आहेत, असा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर केला आहे.
Read More... 'अमोल कोल्हे मतदारांना गृहीत धरून वागत आहेत'; आढळरावांचा टोला
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचाराणे वेग घेतला आहे. या मतदारसंघात वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. खासदारकीचा मधूनच राजीनामा द्यायची घाईपण आणि निवडणूक आल्यावर ती लढविण्याची हौसपण आणि आता निवडणुकीसाठी बाळसंही आलं, असं वागून मतदारांना गृहीत धरण्याचा प्रकार डॉ. अमोल कोल्हेंकडून सुरू आहे. आता मतदार त्यांना धडा शिकवतील, असे प्रतिपादन महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण येथे केले.
Read More... शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जोर कायम, शिवाजी आढळरावांना मताधिक्य देण्याचा संकल्प
Published On
By Manisha Thorat- Pisal
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघात “जनसंवाद” बैठकांचा धडाका सुरु आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटी, वस्ती, गावठाण भागांमध्ये चौकाचौकात जनसंवाद बैठका घेण्यात येत असून नागरिकांचा या जनसंवाद मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Read More... आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंना ‘ओपन चॅलेंज’; अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं!
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता शिवाजीराव पाटलांनी अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज दिले आहे.
Read More... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे ‘‘वारे फिरले’’; शिरुरमध्ये आढळराव पाटलांचा झंझावात!
Published On
By Manisha Thorat- Pisal
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रमध्ये जाहीर सभांचा झंझावत सुरू केला. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर मोदींची एतिहासिक सभा झाली. यामुळे पुणे, शिरूर आणि मावळ यासह बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना फायदा होणार आहे. मोदी सरकारचे व्हीजन आणि देशहिताचे निर्णय यामुळे महायुतीचे पारडे जड झाले असून शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराला गती मिळाली आहे.
Read More... सक्षम उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याच नावाची चर्चा
Published On
By Manisha Thorat- Pisal
राज्यात चौथ्या टप्यात होत असलेल्या लक्षवेधी लढतीमध्ये शिरूर लोकसभा मंतदारसंघांचा क्रमांक वरचा लागतो. या मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत असली तरी खरी लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे कारण इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगलेला आहे.
Read More... 'शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील हेच विजयी होतील'; अजित पवार
Published On
By Manisha Thorat- Pisal
लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आढळरावांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर देण्यात आली असून आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
Read More...