प्रभासच्या अभिनेत्रीचे पाकिस्तान सैन्याशी काय कनेक्शन? पहलगाम हल्ल्यानंतर ट्रोल, अखेर मोठा खुलासा

प्रभासच्या अभिनेत्रीचे पाकिस्तान सैन्याशी काय कनेक्शन? पहलगाम हल्ल्यानंतर ट्रोल, अखेर मोठा खुलासा

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यात बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. पण यामध्ये आता एका अभिनेत्राला ट्रोल केलं जात आहे. या अभिनेत्रीचे पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन आहे का? असे प्रश्न आता सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.

चित्रपटात येण्यापूर्वीच अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला

ही अभिनेत्री म्हणजे सध्या अभिनेता प्रभाससोबत चित्रपट करत असणारी इमानवी. सध्या प्रभास त्याचा आगामी चित्रपट ‘फौजी’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री इमानवी दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. चित्रपटात येण्यापूर्वीच या अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, तिच्याबद्दल अनेक दावे केले जात आहेत, ज्यावर तिने आता प्रतिक्रिया दिली आहे आणि ते आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

अभिनेत्रीची एक लांबलचक इंस्टाग्राम पोस्ट 

इमानवीने सर्व दावे निराधार असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने सोशल मीडियावर तिची खरी ओळखही लोकांना सांगितली आहे. ती एका पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची मुलगी असल्याचा दावा करण्यात आला होता. तर काहींनी असं म्हटलं होतं की तिचे पाकिस्तानी सैन्याशी थेट संबंध होते. या प्रकरणावर स्पष्टीकरण देत अभिनेत्रीने एक लांबलचक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Imanvi (@imanvi1013)


इमानवीने अशा अफवा पसरवणाऱ्या ट्रोलर्सवर टीका केली. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नेटकऱ्यांनी ‘फौजी’ वर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर मात्र इमानवीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पहलगाममधील हल्ल्याचा निषेध केला आणि पाकिस्तानशी तिचे कोणतेही संबंध किंवा कौटुंबिक संबंध नसल्याचेही सांगितले. स्वतःला अभिमानी ‘भारतीय अमेरिकन’ म्हणून संबोधत तिने सांगितले की तिचा जन्म अमेरिकेत झाला. तिने आपले बालपण अमेरिकेत घालवले आहे.

पाकिस्तानशी सैन्यांशी कनेक्शन असल्याच्या चर्चा

इमानवीने तिच्या लांबलचक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘सर्वप्रथम, मी पहलगाममधील दुःखद घटनेबद्दल मनापासून शोक व्यक्त करू इच्छिते. ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत आणि त्यांच्या प्रियजनांसोबत माझ्या संवेदना आहेत. कोणत्याही निष्पाप जीवाचे नुकसान होणे हे दुःखद आहे आणि माझ्या हृदयावर ते खूप मोठ्या ओझ्यांप्रमाणे वाटत आहे. मी हिंसक कृत्यांचा तीव्र निषेध करते. कलेच्या माध्यमातून प्रकाश आणि प्रेम पसरवणे हे नेहमीच ध्येय राहिलेलं एक व्यक्ती म्हणून, मला आशा आहे की लवकरच असा दिवस येईल जेव्हा आपण सर्व एकत्र येऊ.

 

View this post on Instagram

 

A post shared by Imanvi (@imanvi1013)


ऑनलाइन ट्रोलर्स द्वेष पसरवण्याच्या उद्देश

इमानवीने या संदर्भात पुढे लिहिले की, ‘मी माझ्या ओळखीबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल खोट्या अफवा पसरवल्या आहेत त्याबद्दलही बोलू इच्छिते. जेणेकरून हे सर्व गैरसमज दूर होतील. सर्वप्रथम, माझ्या कुटुंबातील कोणीही कधीही पाकिस्तानी सैन्याशी संबंधित नव्हते किंवा सध्या नाही. ऑनलाइन ट्रोलर्सनी द्वेष पसरवण्याच्या एकमेव उद्देशाने या अफवा पसरवल्या आहे. सर्वात निराशाजनक गोष्ट म्हणजे कायदेशीर वृत्तसंस्था, पत्रकार आणि सोशल मीडियावरील व्यक्तींनी त्यांचे स्रोत तथ्य तपासण्यात अयशस्वी ठरले आहेत आणि त्याऐवजी त्यांनी या निंदनीय विधानांची पुनरावृत्ती केली आहे.” असं म्हणत तिने या अफवांबद्दलचा खुलासा केला आहे.

“मी एक अभिमानी भारतीय अमेरिकन”

तसेच आता पुढे तिने म्हटलं की, “मी एक अभिमानी भारतीय अमेरिकन आहे जी हिंदी, तेलुगू, गुजराती आणि इंग्रजी भाषा बोलते.’माझे आईवडील लहानपणी कायदेशीररित्या अमेरिकेत स्थलांतरित झाल्यानंतर माझा जन्म कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथे झाला. त्यानंतर लवकरच मी अमेरिकेची नागरिक झाले. अमेरिकेत माझे विद्यापीठ शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मी अभिनेता, नृत्यदिग्दर्शक आणि नर्तक म्हणून कला क्षेत्रात करिअर केले. या क्षेत्रात खूप काम केल्यानंतर, भारतीय चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. या चित्रपटाने माझ्या जीवनावर खूप खोलवर प्रभाव पाडला आहे. माझ्या रक्तात खोलवर रुजलेली भारतीय ओळख आणि संस्कृती असलेली व्यक्ती म्हणून, मी हे माध्यम विभाजनाचे नव्हे तर एकतेचे माध्यम म्हणून वापरू इच्छिते.”

“पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर तिने दुर्घटनेवर शोक व्यक्त करत आपण प्रेम पसरवत राहू आणि एकमेकांना उभारी देत ​​राहू. इतिहासात, कला हे एक असे माध्यम राहिले आहे जे संस्कृती, लोक आणि अनुभवांमध्ये जागरूकता, सहानुभूती आणि संबंध निर्माण करते. खूप खूप प्रेम, इमानवी.”

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हे काय मनमोहन सिंग यांच सरकार नाही….’ पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणेंचा काँग्रेसला खोचक टोला ‘हे काय मनमोहन सिंग यांच सरकार नाही….’ पहलगाम हल्ल्यावरून नितेश राणेंचा काँग्रेसला खोचक टोला
मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा...
आयबी, एनआयएची टीम डोंबिवलीत दाखल, मोने-जोशी-लेले कुटुंबियांची करणार चौकशी
‘त्यांनी गोळीबार केला, माझा एक हात बाबांच्या डोक्यावर होता अन्…’ संजय लेलेंचा मुलगा भावुक
‘एवढी क्रूरता, हैवान…’, पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी गायक संतापला; 9 वर्षांपूर्वी भारतात आला होता
‘बाप आहे नाना पाटेकर! निर्मात्याला घरी बोलावलं अन् भांडी घासून घेतली’, नेमकं काय झालं होतं?
‘आता युद्ध झालं पाहिजे, माझं रक्त खवळत आहे…’ पहलगाम हल्ल्यावर दिशा पाटनीच्या बहिणीची संतप्त प्रतिक्रिया
लेकाची कृती पाहून संताप; ऋषि कपूर यांनी रणबीरला सर्वांसमोर जोरदार कानशिलात का लगावली होती?