VIDEO: अवॉर्ड शोमध्ये करीना कपूरचा उद्धटपणा; ऐश्वर्याच्या हातातून माइक हिसकावला,ऐश्वर्याच्या कृतीने जिंकले मन
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अभिनयासोबतच त्यांच्या एरोगन्ससाठीही नेहमी चर्चेत असतात. त्यात कधीकाळी करीना कपूरचेही नाव होते. चित्रपटाच्या सेटवर अनेकदा करीनाची अभिनेत्रींसोबत वाद झाल्याचेही अनेकदा बातम्यांमधून समोर आलं आहे. त्याचप्रमाणे एका अवॉर्ड शोमध्ये एक प्रसंग घडला होता, करीनाचे त्या सोहळ्यातील त्या प्रतिक्रियेची तेव्हाही सर्वत्र चर्चा रंगली होती.
करीना स्टेजवर ऐश्वर्या रायसोबत जे वागली ते पाहून सर्वच नाराज
म्हणून करीना कपूर खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या वृत्तीसाठीही ओळखली जाते. बेबोने तिच्या डेब्यूच्या पहिल्याच वर्षी स्टेजवर असे काही वर्तन केले की तिच्या ‘एटीट्यूड’ बद्दल बोललं जाऊ लागलं. असाच एक व्हिडिओ रेडिटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करीना रागावलेली आहे किंवा नाराज आहे स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच ती त्याच रागाच्याभरात स्टेजवर ऐश्वर्या रायसोबत असे वागली की लोक थक्क झाले. तिच्या अशा पद्धतीच्या स्वभावावर लोकही नाराज झाले. पण नक्की असं काय झालं होतं ते त्याबद्दल जाणून घेऊयात.
मनासारख अवॉर्ड न मिळाल्याने करीना संतापली
हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा करीना कपूरला तिच्या ‘रेफ्युजी’ चित्रपटासाठी ‘फेस ऑफ द इयर’ म्हणून तिला अवॉर्ड देण्यात आलं होतं. त्याच वर्षी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटासाठी अमिषा पटेलला ‘डेब्यू ऑफ द इयर’ हे अवॉर्ड देण्यात आलं. ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट पहिल्यांदा करीनाला ऑफर करण्यात आला होता. पण तिने नकार दिल्यानंतर तो चित्रपट अमिषाच्या वाट्याला आला आणि तिने ‘डेब्यू ऑफ द इयर’चा किताब जिंकला. तर करीनाचा पहिला चित्रपट ‘रेफ्युजी’ फारसा चांगला चालला नाही. मात्र करिना कपूरला ‘फेस ऑफ द इयर’ या किताबावर समाधान मानावं लागलं.
उद्धटपणे ऐश्वर्याच्या हातातून माइक हिसकावला
अवॉर्ड शोमध्ये करीना यामुळे नाराज होती हे स्पष्टपणे दिसून आले. जेव्हा करीनाचे नाव ‘फेस ऑफ द इयर’साठी जाहीर झाले तेव्हा करीना नाराजीने आणि उद्धट स्वभावाने स्टेजकडे गेली. जेव्हा ती स्टेजवर पोहोचली तेव्हा ऐश्वर्याने तिला ते अवार्ड दिलं. आणि करीनाला बोलण्यासाठी म्हणून माईक पुढे केला तेव्हा करीनाने जवळजवळ ऐश्वर्याच्या हातातून माइक हिसकावून घेतला. तिच्या या उद्धटपणामुळे लोकांना आश्चर्य वाटले.
Kareena Kapoor Controversial Award Show Moment,
वेळेनुसार करीनाने स्वतःमध्ये तसे खूप बदल केले
पण आता पाहायला गेलं तर वेळेनुसार करीनाने स्वतःमध्ये तसे खूप बदल केले आहेत आणि ती खूप शांत झाली आहे. परंतु तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तिचा हा उद्धट स्वभाव लोकांना खूपच त्रासदायक वाटत होता. कदाचित करीनाचा हा स्वभाव एकंदरीत सुरुवातीला तिच्या फिल्मी कुटुंबातून आलेल्या त्या वातावरणामुळे असल्याचंही म्हटलं जातं होतं. परंतु सोशल मीडियावरील लोकांना तिचा हा दृष्टिकोन आवडला नव्हता. हा थ्रोबॅक व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की,”करीना किती विचित्र पद्धतीने चालत आहे”, तर एका वापरकर्त्याने ऐश्वर्या रायचे कौतुक करत म्हटलं आहे की, “अॅशने बॉलिवूडमध्ये तिचा आदर आणि दर्जा कायम ठेवला आहे”. अनेकांनी ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे कारण करीनाच्या वागण्यामुळे तेव्हा ऐश्वर्याने अजिबात वाईट वाटून न घेता त्याकडे दुर्लक्ष केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List