आज पौर्णिमा की अमावस्या… कुणाचा बकरा कापणार; संजय राऊत यांनी पुन्हा शिंदेंना डिवचले

आज पौर्णिमा की अमावस्या… कुणाचा बकरा कापणार; संजय राऊत यांनी पुन्हा शिंदेंना डिवचले

अनेकांना वाटलं पराभव झाला म्हणून शिवसैनिक खचला असेल. शिवसैनिक घरी बसला असेल. दहशतीखाली आहे असंही अनेकांना वाटलं असेल. पण आजच्या शिबीराने दाखवून दिले की नाशिकचा शिवसैनिक खणखणीत आहे. अशा पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. या पेक्षा वाईट काळ आपण पाहिला आहे. स्वत: शिवसेना प्रमुखांनी अनुभवला आहे. सगळ्या खराब काळाची जी व्यक्ती साक्षी असते ती उज्जवल भवितव्याची निर्माती असते असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. नाशिक येथे शिवसेना पक्षाचा मेळावा झाला त्यात ते मार्गदर्शन करीत होते.

संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणात पराभवाचे समीक्षणच केले. ते यावेळी म्हणाले की नाशिकचा पराभव का झाला. आपण खूप विश्लेषण केलं. नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झालं. तुलसी गॅबार्ड. नाव लक्षात ठेवा. ही साधी बाई नाही. ती मोदीची बहीण आहे. मोदी तिला ‘सिस्टर तुलसी’ असं संबोधतात. मोदी आता अमेरिकेत गेले होते. गंगाजल घेऊन गेले होते. तुलसी गबार्डला मोदी यांनी गंगाजल भेट दिले आहे. ही बाई साधी नाही. ही ट्रम्प सरकारच्या गुप्तचर विभागाची प्रमुख आहे. तिने सांगितलं परवा की ईव्हीएम हायजॅक होतं आहे. ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात. तुलसी यांनीच हे सांगितले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखाने सांगितले आहे. मोदींच्या बहिणीने सांगितलं. तिच्या हातात गंगाजल आहे ती खोटं बोलणार नाही असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

मोदींनी तिच्या हाती गंगाजल दिलं ती खोटं बोलणार नाही. ईव्हीएममुळे घोटाळा होतोय हे जेव्हा तुलसी गॅबार्ड सांगते तेव्हा महाराष्ट्राचा निकाल असा का लागला त्याचं उत्तर जगाला मिळतं. मग आम्हाला वाटतंय, नाशिकमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, देशात गेल्या १० वर्षापासून काय चाललंय. या शिबीराला तुलसी गॅबार्डलाच बोलवायला हवं होतं मार्गदर्शन करण्यासाठी. तुलसी गॅबार्डला पुढच्यावेळी विधानसभेच्या आधी बोलावूया मार्गदर्शनासाठी असेही ते यावेळी म्हणाले.

आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत..

आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. मोदी, शाह, फडणवीस तुम्ही कधी हिंदू झालात. एक सुंदर वाक्य आहे. जो जितका पापी कपटी आणि पाखंडी असतो तो हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो… आम्ही आहोत हिंदुत्ववादी, आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलं आहे. आजच्या शिबीराचा एकच संदेश आहे, आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही खोटे गुन्हे दाखल करा. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. आम्ही आमच्या नेत्याच्या मागे उभं राहू. उद्धव ठाकरे यांच्या मागे उभं राहू असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

अमावस्या आल्यावर भीती वाटते

राज्यात सध्या ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढी. चष्मा. हे महाशय गावाला गेले आहे. मला भीती वाटते. आज पौर्णिमा आहे. अमावस्या आहे. कुणाचा बकरा कापणार आहे. आता महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आल्यावर भीती वाटते. हा महाराष्ट्र कधीच अंधश्रद्धाळू नव्हता असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड
‘हर घर जल’ योजनेतून शहरांबरोबरच गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेचे पितळ उघडे पाडणारी हृदयद्रावक घटना यवतमाळमध्ये...
कोण नामदेव ढसाळ? या कार्यक्रमाचे आयोजन
पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातोय! उद्धव ठाकरे यांचे परखड मत
हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
बीड पुन्हा हादरले; प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण
मंत्री अतुल सावेंना दणका मुख्यमंत्र्यांनी कामे रोखली, नांदेड जिल्ह्यातील 7 कोटी 25 लाख रुपयांच्या तांडा वस्तीच्या कामांना स्थगिती
मोदींच्या घरकुल योजनेत साडेचारशे कोटींचा घोटाळा; मिंधेंच्या सत्ताकाळात कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरल्या! बदलापुरात आठ लाखांचे घर 17 लाखांवर