नेहा कक्कडच्या हातावरचा ‘तो’ टॅटू पाहून भाऊ टोनीला धक्का; थेट तिच्या पायाच पडला
नेहा कक्कड ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते एका टॅटूमुळे. होय नेहाचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता काही दिवसांपूर्वीच बहीण सोनूने तिच्या भावा आणि बहिणीपासून वेगळे होण्याबद्दल बोलले होते, पण आता नेहाने तिच्या भावासाठी असं काही केलं आहे ज्याची खूप चर्चा होत आहे. नेहा कक्कडने तिचा भाऊ टोनीसाठी एक खास टॅटू बनवून घेतला आहे जे पाहून त्याला धक्काच बसला. तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट देखील केला आहे.
“मी थरथर कापत आहे कारण….”
हा व्हिडीओ पोस्ट करत नेहानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘मी आता जे काही आहे, त्याचे सगळं श्रेय टोनी भाईलाच जातं. तर टोनी भाऊ, हे तुमच्यासाठी आहे” असं म्हणत तिने टॅटू काढतानाचा व्हिडिओ शेअर केला आणि ती म्हणाली की, “मी थरथर कापत आहे कारण मला भीती वाटतेय” . यानंतर नेहा म्हणते, ‘मी हे का केलं असेल?’ आणि मग ती हसायला लागते. दरम्यान, तिची एक मैत्रीण त्यावेळेस तिला म्हणते,”लोक अनेकदा त्यांच्या पालकांसाठी किंवा त्यांच्या जोडीदारासाठी हे करतात, भावंडांसाठी हे करून घेणारं क्वचितच कोणी असेल. ते अजून माझ्या माहितीत आलेले नाही.”
नेहाच्या हातावरील टॅटू पाहून टोनीला धक्काच बसला
यानंतर नेहा म्हणते, ‘जर टोनीने योग्य प्रतिसाद दिला नाही तर मी त्याच्या चेहऱ्यावर टॅटू बनवीन.’ यानंतर, व्हिडीओमध्ये दिसतं की, नेहा आणि टोनी केकसमोर उभे आहेत आणि नेहा म्हणते “मला लागलं आहे.” त्यावेळी टोनी तिच्या हाताकडे पाहतो आणि तिच्या हातावरील टॅटू पाहून आश्चर्यचकित होतो, तो तिला मिठी मारतो आणि म्हणतो- सर्वांना अशा बहिणी मिळो.आणि थेट तिच्या पाया पडतो.
भावासाठी नेहाने जे केलं….
टोनी पुढे म्हणतो- “लोक त्यांच्या जोडीदारांसाठी हे करून घेतात…” आणि असं म्हणत तो नेहाच्या पाया पडतो. नेहाच्या या कायमस्वरूपी टॅटूमध्ये पिंकी प्रॉमिस ची झलक आहे आणि त्याखाली दोन्ही भावंडांच्या नावांची पहिली अक्षरे ‘NK’आणि ‘TK’ आहेत, ज्याचा अर्थ आहे कायमचे एकत्र राहण्याचे वचन आहे.
सोनू कक्कडने तिच्या भावंडांशी नाते तोडण्याची पोस्ट का केली होती?
सोनू कक्कडने तिच्या भावंडांशी नाते तोडल्याबद्दल तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, तेव्हा नेहा कक्कडने तिच्या भावासाठी हा टॅटू काढला आहे. अलीकडेच, तिची बहीण सोनूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने लिहिले होते की, ती तिची बहीण नेहा आणि भाऊ टोनी कक्कड यांच्याशी असलेले सर्व संबंध ती तोडत आहे. तथापि, सोनूने आता ती पोस्ट डिलीट केली आहे. पण या पोस्टनंतर अनेक चर्चाही रंगल्या आहेत.पण अजून नेहा आणि टोनीने यावर काही भाष्य केलं नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List