मनोज कुमार यांनी कुटुंबासाठी किती मिलियन डॉलर्सची संपत्ती मागे सोडली?
बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या शोककळा पसरली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी ऐकल्यानंतर सर्व सेलिब्रिटी आणि त्यांचे लाखो चाहत्यांना नक्कीच दु:ख झालं आहे.
उत्कृष्ट अभिनय आणि चित्रपटांद्वारे लोकांच्या मनावर राज्य केलं.
मनोज कुमार यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि चित्रपटांद्वारे तसेच भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवादाद्वारे लोकांच्या मनावर राज्य केले आहे. यामुळेच या अभिनेत्याला जगभरात ‘भरत कुमार’ म्हणूनही ओळखलं जातं. अशा परिस्थितीत त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व चाहेत नक्कीच दु:खी झाले आहेत. मनोज कुमार यांनी चाहत्यांचं नेहमीच मनोरंजन केलं आहे. तसंच आपल्या कुटुंबासाठीही खूप काही केलं आहे.
चित्रपटांमध्ये चांगली कमाई करण्यासोबतच मनोज कुमार यांनी अनेक प्रॉपर्टीजमध्येही गुंतवणूक केली होती
दरम्यान मनोज कुमार यांनी त्यांच्या मेहनतीने कमावलेली त्यांची मालमत्ता किती आहे आणि त्यांनी आपल्या कुटुंबासाठी नक्की किती मालमत्ता मागे सोडली आहे याबद्दल जाणून घेऊयात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोज कुमार यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी 20 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. ही सर्व संपत्ती ते आपल्या कुटुंबासाठी मागे सोडून गेले आहेत. चित्रपटांमध्ये चांगली कमाई करण्यासोबतच मनोज कुमार यांनी वेगवेगळ्या प्रॉपर्टीजमध्येही गुंतवणूक केली होती. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुले कुणाल गोस्वामी आणि विशाल गोस्वामी हे आहेत. मनोज कुमार यांचे दोन्ही मुलगे विवाहित आहेत आणि त्यांना मुलेही आहेत.
अनेक उत्तम चित्रपट दिले…
मनोज कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट केले, जे आजपर्यंत लोकांना आवडतात. चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच, अभिनेत्याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आणि त्यात त्यांना खूप यशही मिळाले. मनोज कुमार यांना ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘कर्मयुद्ध’ यांसारख्या चित्रपटांसाठी पद्मश्री आणि दादासाहेब फाळके यांसारखे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List