‘राज बब्बरची तीन मुले…’, स्मिता पाटीलचा लेक प्रतिक आणि सावत्र भावामाधील वाद संपला?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलच्या कुटुंबीयांमध्ये वाद सुरु असल्याचे दिसत आहे. प्रतिकने बब्बर कुटुंबाशी पूर्णपणे संबंध तोडले आहेत आणि त्याचे नाव प्रतिक पाटील असे ठेवले आहे. दरम्यान, जुही बब्बरने सोशल मीडियावर मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.
जुही बब्बर आणि आर्य बब्बर त्यांचा धाकटा भाऊ प्रतीकवर प्रेमाचा वर्षाव होत आहे. प्रतीकने १४ फेब्रुवारी रोजी दीर्घकाळाची मैत्रीण प्रिया बॅनर्जीशी लग्न केले. त्याने त्याचे वडील राज बब्बर आणि सावत्र भाऊ व बहिणाला लग्नाचे आमंत्रणही दिले नाही. हे सर्व सुरु असताना जुहीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती दोन्ही भावांसोबत दिसत आहे.
जुहीने शेअर केला फोटो
जुहीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टवरून प्रतिक आणि बब्बर कुटुंबीयांमध्ये सुरु असलेला वाद संपल्याचे म्हटले जात आहे. जुहीने तिच्या दोन्ही भावांसोबत – आर्य आणि प्रतीकसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तिघेही हसत खेळत दिसत आहेत. तिने फोटोला, ‘राज बब्बरची तीनही मुले.. जुही, आर्य, प्रतिक… एक सत्य जे कोणीही बदलू शकत नाही’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामुळे भावंडांमधील नाते पुन्हा घट्ट झाल्याचे संकेत मिळतात. प्रतीकच्या लग्नाच्या काही महिन्यांनंतर जुहीने हे पोस्ट केले आहे. प्रतीकच्या लग्नाला कोणीही आले नाही. एवढेच नाही तर, प्रतीकने त्याच्या दिवंगत आईच्या आदरापोटी ‘बब्बर’ हे आडनाव काढून प्रतीक स्मिता पाटील हे नाव ठेवले आहे.
आर्यने व्यक्त केले प्रेम
सिबलिंग डे निमित्त आर्य बब्बरने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावंडांबद्दलचे प्रेमही व्यक्त केले. “भावंडं हे फक्त कुटुंब नसतात – ते आपले पहिले मित्र, तुम्हाला पाठिंबा देणारे तुमचा आधार, बालपणीच्या आठवणींचे रक्षण करणारे असतात. माझी बहीण, जुही, हे सर्व आणि त्याहूनही जास्त राहिली आहे… माझा एक लहान भाऊ, प्रतीक, आहे आणि मी नेहमीच त्याची काळजी घेईन” असे म्हटले आहे.
जुही बब्बर आणि आर्या ही राज बब्बरची पहिली पत्नी नादिरा बब्बर यांची मुले आहेत. राजने नंतर स्मिता पाटीलशी लग्न केले. १९८६ मध्ये स्मिताने प्रतीकला जन्म दिला. स्मिता पाटीलच्या अकाली निधनानंतर, राज पुन्हा नादिरा आणि जुही-आर्यासोबत राहू लागला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List