किराणा दुकानदारासोबत थाटला पहिला संसार, शमी देखील सोडली अर्ध्यावर साथ… हसीन जहाँचं वादग्रस्त खासगी आयुष्य
Mohammed Shami EX Wife Hasin Jahan: भारतील क्रिकेटसंघाचा दमदार क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची पूर्व पत्नी हसीन जहाँ कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. हसीन कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. ज्यामुळे अनेक जण तिला ट्रोल देखील करतात. हसीन हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, शमीसोबत तिचं दुसरं लग्न आहे. हसीन हिचं पहिलं लग्न एका किराणा दुकानदारासोबत झालं होतं. पण दोन मुलांच्या जन्मानंतर हसीन हिने पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिला.
कोण आहे हसीन जहाँ हिचा पहिला पती…
रिपोर्टनुसार, हसीन जहाँ हिचं पहिलं लग्न 2002 मध्ये झालं होतं. किराणा दुकानदारासोबत हसीन हिने लग्न केलं होतं. हसीन हिच्या पहिल्या नवऱ्याचं नाव सैफुद्दीन असं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सैफुद्दीन आणि हसीन यांनी लग्न केलं. 2010 पर्यंत दोघे एकत्र होते.
रिपोर्टनुसार, हसीन हिला पुढे शिक्षण पूर्ण करायचं होतं. पण सासरच्या मंडळींचा नकार असल्यामुळे हसीन जहाँ हिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. हसीन आणि सैफुद्दीन यांना दोन मुलं आहेत. पहिल्या घटस्फोटानंतर हसीन हिने केकेआर टीममध्ये प्रवेश केला.
क्रिकेटच्या मैदानावर हसीन हिने चिअर गर्ल म्हणून करियरला सुरुवात केली. 2012 मध्ये हसीन आणि शमी यांची ओळख झाली. तेव्हापासून शमी आणि हसीन यांची लव्हस्टोरी सुरु झाली. जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2014 मध्ये दोघांनी लग्न केलं.
2015 मध्ये शमी आणि हसीन यांनी जगात लेकीचं स्वागत केलं. हसीन हिने तिच्या पहिल्या लग्नाचं सत्य शमीपासून लपवून ठेवलं होतं. त्यानंतर दोघांचे वाद वाढल्याच्या चर्चा रंगल्या. हसीन हिने शमीवर अनेक गंभीर आरोप केले. तेव्हापासून शमी आणि हसीन विभक्त राहात आहेत.
क्रिकेटच्या मैदानावर मोहम्मद शमी याने अनेक विक्रम रचले पण क्रिकेटपटूला त्याच्या खासगी आयु्ष्यात अनेक अडचणींचा सामना कराला लागला आहे. मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ कायम पतीवर गंभीर आरोप करताना दिसते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List