‘सिकंदर’चं प्रमोशन न करणाऱ्या सेलिब्रिटींवर सलमान नाराज; म्हणाला “त्यांना वाटतं की मला..”

‘सिकंदर’चं प्रमोशन न करणाऱ्या सेलिब्रिटींवर सलमान नाराज; म्हणाला “त्यांना वाटतं की मला..”

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. परंतु थिएटरमध्ये त्याला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळतोय. सलमानचा चित्रपट आणि लागोपाठ गुढीपाडवा, ईदच्या सुट्ट्या असतानाही या चित्रपटाच्या अनेक शोजमध्ये प्रेक्षकांचा आकडा कमी पहायला मिळाला. यादरम्यान आता सलमानच्या एका मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा इंडस्ट्रीतील इतर कलाकारांवर नाराजी व्यक्त करताना दिसतोय. “इतरांच्या चित्रपटाचं प्रमोशन करूनही ते माझ्या चित्रपटाच्या वेळी काहीच बोलत नाहीत”, अशा शब्दांत सलमानने नाराजी व्यक्त केली आहे.

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत सलमानने सांगितलं की शाहरुख खान, सनी देओल आणि इतर कलाकारांच्या प्रोजेक्ट्सदरम्यान त्यांना पाठिंबा देऊनही ते त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन का करत नाही? याविषयी तो म्हणाला, “त्यांना असं वाटत असेल की मला गरज नाही. पण सर्वांना गरज लागते.” यावेळी सलमानने सनी देओलच्या आगामी ‘जाट’ या चित्रपटाचंही कौतुक केलं. येत्या 10 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉक्स ऑफिसवर ‘सिकंदर’ आणि ‘जाट’ची टक्कर होणार हे माहीत असूनही सलमानने त्याच्या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. “सनी ज्या गतीने पुढे जातोय, ते पाहून मला वाटतंय की तो लवकरच मैदानाबाहेर बॉल मारणार आहे”, असं सलमान म्हणाला.

याआधी सलमानने किरण रावच्या ‘लापता लेडीज’, अक्षय कुमारच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ यांसारख्या अनेक चित्रपटांना पाठिंबा देण्यासाठी ट्विट केलं होतं. परंतु सलमान खानच्या करिअरमध्ये सध्या सर्वोत्तम काळ सुरू नसल्याचं पहायला मिळतंय. याआधी ‘किसी का भाई किसी की जान’ (2023), ‘अंतिम’ (2021) आणि ‘राधे’ (2021) हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. तर ‘सिकंदर’ या चित्रपटाने गेल्या चार दिवसांत 84.25 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटात सलमानसोबतच रश्मिका मंदाना, सत्यराज, शर्मन जोशी, काजल अग्रवाल यांच्याही भूमिका आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले, परंतु दिग्ग्ज अभिनेते मनोज कुमार यांच्यासारखं दुसरं कोणी नव्हतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक हिट...
मनोज कुमार यांचे गाजलेले ‘5’ सिनेमे, मोडले होते सर्व रेकॉर्ड
भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या मनोज कुमार यांचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास
सागर कारंडेंना इन्स्टाग्रामवर लाईक्स मिळवणं पडलं महागात, 61 लाखांची फसवणूक, काय आहे प्रकरण?
गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेवगाव पोलिसांची कारवाई; आठ आरोपी गजाआड
वादळी पावसाने पुण्याला झोडपले! झाडे पडली, रस्त्यांवर पाणी, वाहतूककोंडी
डोंबिवली-ठाणे प्रवास धोक्याचा; कोपर-दिवा दरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू