सुष्मिताच्या आयुष्यात वाईट पुरुषांची एन्ट्री! अभिनेत्री म्हणते, ‘सगळे पुरुष चांगले पण माझ्यासाठी…’
Sushmita Sen: अभिनेत्री सुष्मिता सेन हिने वयाच्या 49 व्या वर्षी देखील लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. माझ्यासाठी मला कोणता चांगला वाटलाच नाही… माझ्या मनासारखा पर्टनर भेटला तर नक्की लग्न करेल… असं देखील अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली होती. शिवाय सुष्मिताने कधी तिचे प्रेमप्रकरणं गुपित देखील ठेवले नाही. एवढंच नाही तर, अभिनेत्री कायम तिच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींबद्दल, आई – वडिलांबद्दल आणि तिच्या मुलींबद्दल चाहत्यांना सांगत असते.
सुष्मिताने तिच्या लग्नाबद्दल देखील सांगितलं होतं. अभिनेत्री एका चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न करणार होती. पण सुष्मिता त्या व्यक्तीच्या जाळ्यातून स्वतःची सुटका करण्यास यशस्वी ठरली. सांगायचं झालं तर, सुष्मिता कायम तिच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे ओळखली जाते.
एका जुन्या मुलाखतीत अभिनेत्री तिच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. अभिनेत्री म्हणाली होती, ‘मी स्वतःला भाग्यशाली समजते. कारण असं अनेकदा झालं आहे की, मी चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवला आणि वेळीच स्वतःला मी सावध देखील केलं.’
‘चुकीच्या व्यक्तींच्या सहवासात मी होती. पण माझ्यासोबत काहीही चुकीचं झालं नाही. आयुष्यात जेवढी नाती संपतात, तेवढीच आपली प्रगती होते. पण काही गोष्टी वाईट देखील घडल्या आहे. स्पष्ट शब्दांमध्ये मला हे चुकीचं आहे असं सांगण्यात आलं… आत्मसन्मान अधिक प्रिय असल्यामुळे मी यशस्वी ठरली. आयुष्यात आलेले सर्व पुरुष चांगले होते. पण माझ्यासाठी चुकीचे होते…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
सुष्मिता हिचं नाव जवळपास 10 सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण अभिनेत्रीचं कोणत्याच सेलिब्रिटीसोबत नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. रिपोर्टनुसार, बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सुष्मिताचं नाव दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यासोबत जोडण्यात आलं. आता अभिनेत्री रोहमन शॉल याला डेट करत आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
एवढंच नाही तर, सुष्मिता कायम रोहमन शॉल आणि दोन मुलींसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर सुष्मिताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List