उन्हाळ्यात गव्हाच्या पीठात मिक्स करा ‘ही’ गोष्ट, पोट राहील थंड

उन्हाळ्यात गव्हाच्या पीठात मिक्स करा ‘ही’ गोष्ट, पोट राहील थंड

उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवणे आणि पचनसंस्था निरोगी ठेवणे खूप महत्वाचे असते. कारण कडक सूर्यप्रकाश, वातावरणात उष्णतेच्या लाटा आणि वाढते तापमान, यामुळे आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी आपण उन्हाळ्यात थंड पदार्थांचा समावेश करत असतो. अशातच जर खाण्यात थोडासाही निष्काळजीपणा केला तर बद्धकोष्ठता, गॅस, आम्लता आणि डिहायड्रेशन यासारख्या पोटाच्या समस्या त्रास देतात. अशा परिस्थितीत, शरीराला थंडावा देणाऱ्या आणि पचन सुधारणाऱ्या गोष्टी तुमच्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे.

भारतीय घरांमध्ये गव्हाच्या पिठाच्या पोळी शिवाय जेवण पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये एक गोष्ट मिक्स केली तर ती तुमचे शरीर थंड ठेवतेच पण तुम्हाला अनेक फायदे देखील देते. आज या लेखात आपण जाणून घेऊयात की शरीर थंड ठेवण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये कोणती गोष्ट मिक्स करावी.

गव्हाच्या पिठामध्ये बार्ली म्हणजेच जव मिक्स करावे. कारण बार्ली हे असेच एक धान्य आहे जे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि पोट थंड ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. जर तुम्ही तुमच्या आहारात थोडे बदल केले तर तुम्ही कोणत्याही औषधाशिवाय अनेक समस्या टाळू शकता. तुमच्या नेहमीच्या गव्हाच्या पिठामध्ये बार्लीचे पीठ मिक्स करा आणि पोळी बनवा आणि तुम्हाला त्याचे आश्चर्यकारक फायदे स्वतः जाणवतील.

गव्हाच्या पिठामध्ये बार्लीचे पीठ का मिक्स करावे?

बार्लीची चव थोडी गोड असते आणि त्यात थंडावा असतो. जेव्हा ते गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून पोळी बनवली जाते. तेव्हा ते केवळ चव वाढवतेच असे नाही तर आरोग्यासाठी वरदान देखील ठरते. विशेषतः उन्हाळ्यात त्याचे सेवन शरीराला थंड ठेवते आणि पचनसंस्था सुधारते.

गव्हाच्या पीठात बार्ली मिक्स करून खाण्याचे फायदे

1. पोट थंड करते- बार्लीमध्ये थंडावा असतो, जो उन्हाळ्यात खाल्ल्यास शरीराचे तापमान संतुलित करण्यास मदत करतो. याच्या सेवनाने तुम्हाला उष्माघातापासून संरक्षण करते आणि निर्जलीकरणाचा धोका कमी करते.

2. बद्धकोष्ठतेपासून आराम – बार्लीमध्ये भरपूर फायबर असते, जे आतडे साफ करण्यास मदत करते. ज्यांना वारंवार बद्धकोष्ठतेची समस्या सतावत असते त्यांच्यासाठी हे एक रामबाण उपाय आहे.

3. पोट फुगणे आणि गॅसची समस्या दूर करते- बार्लीचे सेवन पोटात गॅस तयार होण्यास प्रतिबंध करते आणि भूक देखील नियंत्रित करते. हे नैसर्गिक डिटॉक्ससारखे काम करते. त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन खूप फायदेशीर आहे.

4. वजन कमी करण्यास उपयुक्त – फायबर भरपूर असल्याने यांच्या सेवनाने पोट बराच काळ भरलेले राहते. यांमुळे जास्त खाण्याच्या सवयीवर नियंत्रण राहते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

5. साखरेची पातळी नियंत्रित करते- बार्लीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहण्यास मदत होते, त्यामुळे मधुमेहाचे रुग्णही त्यापासून बनवलेली रोटी सहज खाऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम मराठी लोग गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो… घाटकोपरमध्ये गुजरात्यांकडून मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक तुम मराठी लोग गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो… घाटकोपरमध्ये गुजरात्यांकडून मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक
स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईत विविध जातीचे, धर्माचे लोकं येतात आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने इथे मेहनत करून राहतात. कोणी काय...
‘त्या’ सीनच्या शूटिंनंतर बिघडली अभिनेत्रीची तब्येत; उल्टी केली, शरीर थरथप कापू लागलं..
सलमानच्या सततच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल अक्षय कुमार स्पष्टच बोलला..
धक्कादायक… शाहरुख खानच्या बायकोच्या हॉटेलमध्ये ‘भेसळयुक्त अन्न’, कोणी केली पोलखोल?
‘ब्राह्मणांना लाज वाटतेय..’; ‘फुले’ चित्रपटाच्या सेन्सॉरशिपवरून अनुराग कश्यपचा परखड सवाल
पालकांच्या इच्छेविरोधात जाऊन विवाह केला असेल तर पोलीस संरक्षण मिळणार नाही, अलाहबाद कोर्टाचे मत
काम 50 हजारांचे अन् बील 2 लाखांचं, पुणे बाजार समिती संचालक मंडळाचा प्रताप उघड