पंढरपुरात स्वच्छतेचं काम करणाऱ्या महिलेला पांडुरंग पावला; 21 लाखांची लॉटरी लागली

पंढरपुरात स्वच्छतेचं काम करणाऱ्या महिलेला पांडुरंग पावला; 21 लाखांची लॉटरी लागली

पिढ्यानपिढ्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या पंढरपुरातील मेहतर समाजातील एका गरीब महिलेला चक्क 21 लाखांची लॉटरी लागली आहे. साक्षात पांडुरंगच पावला अशी भावना मनिषा वाघेला यांनी व्यक्त केली आहे. पिढ्यान पिढ्या स्वच्छतेची कामे करणारा मेहतर समाज पंढरपुरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे. या समाजातील महिला आणि पुरुषांना पंढरपूर शहरातील स्वच्छतेची कामे दिली जातात. मनीषा वाघेला या देखील शहरातील अनेक लोकांच्या शौचालयांच्या स्वच्छतेचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत असतात.

मनीषा वाघेला यांचे पंढरपुरातील मेहतर गल्लीमध्ये ‘दहा बाय दहा’चे पत्र्याचे घर आहे. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने त्या स्वच्छतेची काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.अलीकडेच त्या पंढरपुरातील चौफाळा येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या‌.यावेळी त्यांनी सहज म्हणून शेजारीच असलेल्या लॉटरी विक्री केंद्रातून पन्नास रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. हे तिकीट काढून त्या विसरुन देखील गेल्या होत्या.

मुलांना चांगले शिक्षण देणार

परंतू त्यांनी वृत्तपत्रात आपण खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकीटाचा नंबर सहज चेक केला तर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ध्यानीमनी नसताना त्यांना 21 लाख रुपयांचं बक्षिस लागल्याचे कळाल्याने त्यांना सुखद धक्काच बसला. २१ लाखांची लॉटरी लागल्याचे कळताच पांडुरंग पावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्या या बक्षिसाच्या मिळालेल्या पैशातून एक छोटेसे घर खरेदी करायचे आहे. आपण आपल्या मुलांना हे काम करावे लागू नये म्हणून चांगले शिक्षण देणार असा मनोदय मनीषा वाघेला यांनी व्यक्त केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम मराठी लोग गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो… घाटकोपरमध्ये गुजरात्यांकडून मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक तुम मराठी लोग गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो… घाटकोपरमध्ये गुजरात्यांकडून मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक
स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईत विविध जातीचे, धर्माचे लोकं येतात आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने इथे मेहनत करून राहतात. कोणी काय...
‘त्या’ सीनच्या शूटिंनंतर बिघडली अभिनेत्रीची तब्येत; उल्टी केली, शरीर थरथप कापू लागलं..
सलमानच्या सततच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल अक्षय कुमार स्पष्टच बोलला..
धक्कादायक… शाहरुख खानच्या बायकोच्या हॉटेलमध्ये ‘भेसळयुक्त अन्न’, कोणी केली पोलखोल?
‘ब्राह्मणांना लाज वाटतेय..’; ‘फुले’ चित्रपटाच्या सेन्सॉरशिपवरून अनुराग कश्यपचा परखड सवाल
पालकांच्या इच्छेविरोधात जाऊन विवाह केला असेल तर पोलीस संरक्षण मिळणार नाही, अलाहबाद कोर्टाचे मत
काम 50 हजारांचे अन् बील 2 लाखांचं, पुणे बाजार समिती संचालक मंडळाचा प्रताप उघड