“Excuse Me” बोलल्यावरून डोंबिवलीत मराठी-उत्तर भारतीयात हाणामारी, पती-पत्नीच्या भांडणात हिंदी भाषिकांना प्रसाद
मराठी आणि हिंदी भाषावादाचा परिणाम आता डोंबिवलीतही झाला आहे. येथे एकमेकांच्याशी ओळखपाळख नसलेल्या शेजाऱ्यांमध्ये इंग्रजीत “Excuse Me” बोलल्याने मराठी प्रेम उफाळून आल्याने दांडक्यांनी मारहाण झाल्याचा प्रकार सुशिक्षितांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली येथे घडली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.
डोंबिवली पश्चिम येथील जुनी डोंबिवली परिसरात एका साध्या “एस्क्युज मी” या इंग्रजी शब्दावरून मोठा वाद निर्माण झाला. गणेश श्रद्धा बिल्डींगमध्ये राहणाऱ्या पुनम अंकीत गुप्ता या महिलेला इंग्रजीत बोलल्याने “मराठीत बोला” असे सांगून तिला आणि तिच्या कुटुंबीयांवर बेदम मारहाण झाली आहे.या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात दोन्ही महिलांच्या वेगवेगळ्या तक्रारी घेतल्या आहेत. या प्रकरणात तिघा आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
‘इंग्रजीत नको, मराठीत बोला’ म्हणत मारहाण
जुनी डोंबिवली येथील गणेश श्रद्धा इमारतीमध्ये राहणाऱ्या तक्रारदार त्यांच्या मैत्रिणीसोबत या सोमवारी ( 7 एप्रिल 2025 ) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गाडीवरुन घराकडे परतत होते. त्यावेळी इमारतीबाहेर रस्त्यावर उभे राहून विरोधक आणि त्यांची पत्नी भांडत होते. त्यावेळी तक्रारदाराने त्यांना बाजूला होण्यासाठी ‘एक्स्युज मी’ असे इंग्रजी म्हटले आणि त्यावेळी विरोधक आणि त्यांची पत्नीने ‘इंग्रजीत नको, मराठीत बोला’ म्हणत असे म्हणत तक्रारदार आणि पुनम अंकीत गुप्ता आणि त्यांच्या बहिणीला बेदम मारहाण केली. मारहाणीत पुनम यांच्या नाकातील फुली तुटून नुकसान झाले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 115(2), 352, 324(4) अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List