शासकीय कर्मचारी असूनही हिंदीतून घोषणा, महिलेने जाब विचारताच ट्रॅफिक पोलिसाने दिलं असं उत्तर
शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्याचा नियम आहे. पण मुंबईत एका एका वाहतूक पोलिस हवालदाराने यावरुन महिला प्रवाशासोबत हुज्जत घातली. शासकीय कर्मचाऱ्याने मराठीत बोलण्याचा असा कोणताही नियम नसल्याच सांगत वाहतूक पोलिस हवालदाराने महिलेशी हुज्जत घातली. बुधवारी ही घटना घडली. गोरेगाव येथे राहणाऱ्या अनुप्रिया देसाई या बुधवारी दुपारी काही कामानिमित्त आपल्या वाहनाने बाहेर गेल्या होत्या. त्याचदरम्यान वाहतूक पोलिसांच्या गाडीने त्यांचे वाहन ओढून नेले.
त्यावेळी त्या गाडीजवळ पोहोचल्या असता पी. एन. साबळे (बक्कल क्र : 060265) हे हवालदार तिथे होते. त्यांच्याकडील स्पीकरमधून ते हिंदीमध्ये उद्घघोषणा करत असल्याचे त्यांनी पाहिले. तुम्ही मराठी घोषणा का करत नाहीत? अशी सातत्याने विचारणा अनुप्रिया देसाई यांनी केली. त्यावेळी मराठीत बोलण्याचा कोणताही नियम नसल्याचं साबळे यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांच्याकडील स्पीकरमध्ये तांत्रिक बदल केल्याचे देसाई यांनी सांगितले. देसाई यांनी या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केलं आहे.
‘में क्यू बोलू, मराठी नही आता मेरे को’
दोन दिवसांपूर्वी पवईतही एक असाच प्रकार घडला. पवईतील ‘एल अँड टी’ कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेबद्दल असाच अनादर दाखवला. त्याच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जे केलं, त्यामुळे त्याला आता मराठी भाषा नेहमी लक्षात राहीलं. पवईतील ‘एल अँड टी’ कंपनीच्या सुरक्षा रक्षकाचा एका मराठी माणसासोबत वाद झाला. तो त्याला मराठीत बोलायला सांगत होता. त्या गार्डने “क्यू मराठी आता नही, में क्यू बोलू. मराठी नही आता मेरे को, जरुरी थोडी हैं, मराठी गया तेल लगाने” असा माज त्या सिक्युरिटी गार्डने दाखवला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List