महागाईने पिचलेल्या जनतेचे या दरवाढीने कंबरडे मोडणार आहे – सतेज पाटील
केंद्र सरकारने पेट्रोल व डिजेलच्या दरावर 2 रुपये शुल्क वाढवलं आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या चढउतार आणि ट्रम्प प्रशासनाने प्रत्युत्तरात्मक टॅरिफची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असं सांगण्यात येत आहे.त्यावरून सध्या केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
काँग्रेस नेते व आमदार सतेज पाटील यांनी यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ”आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या टेरीफ बॉम्बमुळे कच्च्या तेलाचे दर कोसळले असताना देखील पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्याचा तुघलकी आणि अविचारी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नागरिकांच्या खिशावर डल्ला मारून सरकार कसल्या ‘आर्थिक सुधारणा’ करत आहे? नागरिकांवर कराचा बोजा टाकून सरकार नफेखोरी करत असून महागाईने पिचलेल्या जनतेचे या दरवाढीने कंबरडे मोडणार आहे. लोकांना गाजर दाखवलेले ‘अच्छे दिन’ हेच का? असा सवाल त्यांनी या ट्विटमधून केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List