देशात आले वजन कमी करणारे औषध; अमेरिकेत यशस्वी; किंमतही खिशाला परवडणारी

कुणी वजनावरून चिडवले तर काळजाच्या आरपार लागते. वजन कमी करण्यासाठी अनेक दिव्य करावी लागतात. पण, एकवेळ अशी येते की त्याचा पंटाळा यायला लागतो आणि मग वाढू दे वजन… कुणीही काहीही बोलू दे.. अशी भावना निर्माण येते. पण, अशा स्थूल लोकांसाठी खूशबर आहे. अमेरिकेत यशस्वी ठरलेले वजन कमी करणारे औषध हिंदुस्थानात लाँच झाले आहे.
लठ्ठपणा कमी करणारे आणि मधुमेहविरोधी औषध मोंजारो हिंदुस्थानात उपलब्ध होणार आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडने पंट्रोल ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाकडून या औषधासाठी मान्यता मिळाली आहे. अमेरिकन कंपनीचे हे औषध असून एली लिलि अँड कंपनीने या औषधाची निर्मिती केली आहे. अमेरिकेत या औषधाचे नाव वेगळे असून हिंदुस्थानात ते नव्या नावाने विकले जाणार आहे. औषध घेऊन वजन कमी करणे किती योग्य आहे असे अनेक डॉक्टर म्हणत आहेत. वजन कमी करण्याच्या औषधांमुळे दुष्परिणामांचा सामनाही करावा लागू शकतो असा इशारा अनेक डॉक्टरांनी दिला आहे. परंतु, मधुमेही रुग्णांसाठी मात्र हे औषध वरदान ठरणार आहे, याला मात्र अनेक डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे.
असे काम करते हे औषध
मोंजारो हे औषध टाइप-2 मधूमेह आणि लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. जेव्हा अन्न खातो तेव्हा जीएलपी-1 म्हणजेच ग्लुकगॉनसारखे पेप्टाइड-1 आणि जीआयपी म्हणजेच ग्लुकोज-आश्रित इन्सुलिनट्रॉपिक पॉलीपेप्टाइड नावाचे दोन हॉर्मोन्स सक्रिय होतात.
मोंजारो हे या दोन्ही हार्मोन्सची कृत्रिम प्रत आहे, असे संबंधित कंपनीने म्हटले आहे. हे औषध इन्सुलिनचे उत्पादन वाढवून रक्तातील सारख नियंत्रित करते आणि भूक कमी करते, कमी अन्न खाण्याची इच्छा होते.
या औषधाचा अमेरिकेत 2,539 लोकांवर प्रयोग करण्यात आला. 15 मिलीग्रॅमचा डोस घेतलेल्यांचे सरासरी 21.8 किलो वजन कमी झाले. तर 5 मिलीग्रॅमचा डोस घेतलेल्यांचे सरासरी 15.4 किलो वजन कमी झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List