ऑनलाईन कर्ज फेडणे पडलं भलतंच महागात
एका फायनान्स कंपनीकडून ऑनलाईन अर्ज करून मिळवलेल्या कर्जाची ऑनलाईन परतफेड करणे एका व्यक्तीला भलतेच महागात पडले आहे. स्वतःचे घर घ्यायचे असल्याने प्रतीक्षा नगरात राहणाऱ्या चंद्रकांता बेहेरा यांना कर्ज हवे होते. त्याकरिता ते ऑनलाईन कर्ज देणाऱ्या कंपनीची माहिती घेत असताना त्यांना लेन्डींगकार्ट फायनान्स लिमिटेड या कंपनीची माहिती मिळाली. सूर्यकांता यांनी त्या कंपनीला ऑनलाईन अर्ज करून पाच लाख 20 हजार रुपयांचे कर्ज मिळवले. त्यानंतर त्यांनी कर्जाचे 18 हप्तेदेखील भरले. पण व्याजदर खूप असल्याने सूर्यकांता यांनी कंपनीला कर्जाची रक्कम एकदाच देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मित्र, नातेवाईकांकडून सहा लाख रुपये घेतले आणि गुगलवर कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधला व ऑनलाईन पैसे जमा केले. पण कर्जाच्या खात्यात ती रक्कम जमा झाली नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List