रेखा म्हणजे फक्त ‘टाईमपास’, हेमा मालिनीसोबत बसला लग्न मंडपात, संसार थाटला मात्र तिसरीसोबत…
Love Life: चाहत्यांमध्ये सेलिब्रिटींच्या कामापेक्षा त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा अधिक रंगलेल्या असतात. सेलिब्रिटींचे अफेयर, लग्न, घटस्फोट इत्यादी गोष्टी अधिक चर्चेत असतात. पूर्वी सोशल मीडिया नसल्यामुळे सेलिब्रिटींचं खासगी आयुष्या लाईमलाईटपासून दूर होतं. पण आता सोशल मीडियाच्या काळात 80 – 90 च्या दशकातील सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असते. बॉलिवूडमध्ये एक असा अभिनेता आहे ज्याने अनेक अभिनेत्रींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं पण दुसऱ्यात महिलेसोबत लग्न केलं.
सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ते अभिनेते दुसरे तिसरे कोणी नाही तर, दिग्गज अभिनेते जितेंद्र आहे. जितेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. अभिनेत्री रेखा, हेमा मालिनी अनेकांसोबत त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. पण त्यांनी गर्लफ्रेंड शोभा कपूर यांच्यासोबत संसार थाटला.
अभिनेत्री रेखा : रेखा आणि जितेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. दरम्यान दोघांच्या रिलेशिनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण तेव्हा जितेंद्र शोभा कपूर यांना डेट करत होते. रिपोर्टनुसार, जितेंद्र यांनी सिनेमातील एका ज्युनियर अभिनेत्यासमोर रेखा म्हणजे फक्त टाईमपास… असं म्हटलं होतं. त्यानंतर रेखा आणि जितेंद्र यांचं नातं संपलं.
अभिनेत्री हेमा मालिनी : हेमा मालिनी यांच्यासोबत देखील जितेंद्र यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं. पण लग्नमंडपात धर्मेंद्र आले आणि दोघांचं लग्न मोडलं. अखेर धर्मेंद्र यांनी पत्नी आणि चार मुलं असताना हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला.
अभिनेत्री श्रीदेवी : ‘हिम्मतवाला’ सिनेमाच्या शुटिंगनंतर श्रीदेवी आणि जितेंद्र यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. पण तेव्हा जितेंद्र विवाहित होते. तेव्हा जितेंद्र यांची पत्नी शोभा कपूर यांनी श्रीदेवी यांना घरी बोलावलं. दोघींच्या भेटीनंतर श्रीदेवी यांनी जितेंद्र यांच्यासोबत असलेलं नातं तोडण्याचा निर्णय घेतला.
अभिनेत्री जया प्रदा : जितेंद्र यांचं नाव जयाप्रदा यांच्याशी देखील जोडले गेलं होतं. अनेक रिपोर्ट्समध्ये जितेंद्र आणि जयाप्रदा यांच्यातील संबंध खूप खास असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं आणि नंतर वेगळे झाले. दोघांनी ‘स्वर्ग से सुंदर’, ‘संजोग’, ‘लोक परलोक’, ‘ऐसा प्यार कहाँ’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List