म्हातारपण दिसून येतंय.. म्हणणाऱ्यांना सलमान खानने दिलं सडेतोड उत्तर

म्हातारपण दिसून येतंय.. म्हणणाऱ्यांना सलमान खानने दिलं सडेतोड उत्तर

सोशल मीडिया आणि ट्रोलिंग हे जणू समीकरणच बनलं आहे. सेलिब्रिटींना या ट्रोलिंगचा खूप फटका बसतो. त्यांच्या एखाद्या फोटो किंवा व्हिडीओवर नेटकरी नकारात्मक कमेंट्सचा वर्षावच करू लागतात. या ट्रोलिंगवर काही सेलिब्रिटी सडेतोड उत्तर देतात. तर काहीजण त्याकडे दुर्लक्ष करणं पसंत करतात. मात्र बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणारा नाही, हे नुकत्याच एका कार्यक्रमात दिसून आलं. त्याच्या आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यासाठी मुंबईत मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ट्रेलर लाँचला सलमानसोबतच त्याचे वडील सलीम खान, सहअभिनेत्री रश्मिका मंदाना, सत्यराज, काजल अग्रवाल, शर्मन जोशी, दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस आणि निर्माता साजिया नाडियादवाला उपस्थित होते.

‘सिकंदर’चा ट्रेलर लाँच झाल्यानंतर सलमान आणि इतर कलाकार हे विविध प्रश्नांची उत्तर देण्यासाठी सज्ज झाले. त्यावेळी त्याच्या एका व्हायरल फोटोचा विषय उपस्थित झाला. सलमानने त्याच्या कुटुंबीयांसाठी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी ‘सिकंदर’च्या स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. तेव्हाचा हा फोटो होता. यावेळी पापाराझींनी सलमानचे जे क्लोज अप फोटो क्लिक केले, त्यात त्याचं वय दिसून येत होतं. यावरून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘सलमान म्हातारा झालाय’, ‘सलमानच्या चेहऱ्यावर म्हातारपण दिसू लागलंय’ असे कमेंट्स त्यावर होते. अशा ट्रोलर्सना आता सलमानने उत्तर दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘सिकंदर’चा दमदार ट्रेलर पाहिल्यानंतर सूत्रसंचालकाने सलमानला त्याची ऊर्जा आणि स्क्रीनवर दिसलेला टवटवीत चेहरा, यामागचं रहस्य विचारलं. त्यावर उत्तर देताना सलमान म्हणाला, “अधून मधून कधी-कधी अशी गडबड होत असते. पाच – सात रात्र झोपलो नाही की आणि मग सोशल मीडियावाले हात धुवून मागे लागतात. अशा वेळी त्यांना दाखवावं लागतं की मी अजूनही इथे आहे.”

‘सिकंदर’ या चित्रपटात सलमानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. सलमान आणि रश्मिका यांच्या वयात 31 वर्षांचं अंतर असून चित्रपटात तिने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. या अंतराबद्दल प्रश्न विचारला असता सलमान पुढे म्हणाला, “जर हिरोइनला काही समस्या नाही, हिरोइनच्या वडिलांना काही समस्या नाही, उद्या जेव्हा तिचं लग्न होईल, मुलं होतील आणि तेव्हासुद्धा आम्ही एकत्र काम करू. पतीची परवानगी तर मिळेलच ना?” हे ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. सलमानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर येत्या 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सी लिंकवर टोल ऑपरेटरला 200 मीटर फरफटत नेले सी लिंकवर टोल ऑपरेटरला 200 मीटर फरफटत नेले
टॅक्सी चालकाने वांद्रे – वरळी सी लिंकवरील टोल बूथ चालकाला 200 मीटर फरफटत नेल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी...
सर्व रुग्णालयांची थकीत बिले देणार
क्रिकेटपटूंसाठी स्वच्छतागृहे बांधा!
युनिव्हर्सल फुटपाथ धोरणाला हरताळ, अंधेरी-कुर्ला रोड सफेद पूल परिसरात रहिवाशांची गैरसोय
इंदूरमध्ये सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर कुणाल कामराचे फोटो लावले, संजय राऊत म्हणाले की,’ ये तो अपुन जैसा…
IPL 2025 – चौकार अन् षटकारांच्या आतषबाजीत पंजाबचा विजयी धमाका, गुजरात पराभूत
सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक, व्हिडीओ व्हायरल