मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेत इतक्या चिडल्या जया बच्चन, थेट महिलेचा हात पकडला अन्..
ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन नेहमीच त्यांच्या तापट स्वभावामुळे चर्चेत असतात. पापाराझी आणि माध्यमांसमोर त्यांना अनेकदा चिडताना पाहिलं गेलंय. कधी त्या फोटोग्राफर्सवर भडकतात तर कधी त्या पत्रकारांना सुनावतात. असे त्यांचे अनेक व्हिडीओ आजवर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेतील आहे. मनोज कुमार यांचं 4 एप्रिल रोजी पहाटे 3.30 वाजता वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं. 5 एप्रिल रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर 6 एप्रिल रोजी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. उदित नारायण, जॉनी लिव्हर, आशा पारेख, राकेश रोशन, रंजीत, आमिर खान, प्रेम चोपडा, पद्मिनी कोल्हापुरे, सोनू निगम यांसारखे सेलिब्रिटी याठिकाणी उपस्थित होते. त्यात जया बच्चन यांचाही समावेश होता. यावेळी त्या एका व्यक्तीसोबत गप्पा मारत असताना एका महिलेनं त्यांना मागून बोलावलं. जया बच्चन चकीत होऊन मागे वळून पाहतात तेव्हा आणि त्यानंतर त्या महिलेचा हात पकडून जोरात पुढे झटकतात. संबंधित महिलेसोबत त्यांचे पतीसुद्धा तिथे उभे असतात. ते जया बच्चन यांच्यासोबत पत्नीचा फोटो क्लिक करण्यासाठी उभे असतात. परंतु जया बच्चन त्यांनासुद्धा ओरडतात. यानंतर दोघं मिळून हात जोडून जया यांना हॅलो म्हणतात. तेव्हासुद्धा जया त्यांना असं काही म्हणतात की ते जोडपं दूरच निघून जातात.
जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘ही इतकी चिडकी आहे माहीत असतानाही लोक तिच्यासोबत फोटो का काढायला जातात’, असं एकाने लिहिलं. तर ‘सून ऐश्वर्या यांना कशी सांभाळत असेल’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘यांना अमिताभ बच्चनच सहन करू शकतात’, असंही एका नेटकऱ्याने लिहिलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List