महाराष्ट्रातल्या लोकांना विचारा भाजपने महाराष्ट्र निवडणूक कशी जिंकली, ते सांगतील; राहुल गांधींचा हल्लाबोल
अहमदाबादमधल्या काँग्रेसच्या 84 व्या अधिवेशनात काँग्रेस नेते, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी भाजपसह निवडणूक आयोगावर निशाणा साधला. महाराष्ट्रातल्या लोकांना विचारा भाजप कशी निवडणूक जिंकलीय. मागणी करून थकलो पण निवडणूक आयोगाने मतदार याद्या अजूनही दिल्या नाहीत. महाराष्ट्रात वाढलेल्या मतदानावरून राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे भाजपवर बरसले
महाराष्ट्रातल्या लोकांना विचारा, ते सांगतील भाजपने महाराष्ट्र निवडणूक कशी जिंकली, कशा प्रकारे भाजपने निवडणूक जिंकली आहे? हे तुम्हाला सांगतील. आम्ही निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्रातील मतदारांची यादी मागून मागून थकलो. अद्याप निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादी दिलेली नाही. हे सत्य आहे. पण आगामी काळा बदल घडेल. लोकांचा मूड दिसत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
…तर नरेंद्र मोदी देश विकून निघून जातील; मल्लिकार्जुन खरगे यांचा निशाणा
आपले पंतप्रधान कुठेही माथा टेकवून येतात. बांगलादेशने उलट वक्तव्य केली तही पंतप्रधान मोदी त्यांच्या सोबत आहेत. ट्रम्प मोदींना म्हणाले आता गळाभेट नाही तर टॅरिफ लावणार. कुठे गेली मोदींची 56 इंचाची छाती? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. नव्या वक्फ कायद्यावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. वक्फ कायदा हा धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला आहे, असे राहुल गांधी म्हणाले. ज्या पक्षाकडे विचारधारा आहे तोच पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा समना करू शकतो. आपण ब्रिटिश आणि आरएसएसच्या विधारधारेशी लढलो होतो. विद्यापीठांचे कुलगुरू हे आरएसएसचे असावेत, असं संविधाना कुठेच लिहिलेलं नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी सडकून टीका केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List