नगरविकास मंत्र्यांनी त्यांचे खिसे भरले पण रस्त्यात माल भरला नाही, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी वरळी मतदारसंघात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रखडलेल्या रस्त्यांच्या कामांवरून राज्य सरकारवर व एशंसि गटावर जोरदार हल्ला चढवला. ”नगरविकास मंत्र्यांनी त्यांचे खिसे भरले पण रस्त्यात माल भरला नाही. ठाण्यातील कोपरी पूल सहा महिन्यात फुटायला लागलाय. जशी एसंशि गटाची क्वालिटी तशीच रस्त्याची क्वालिटी झालीय”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
”आज वरळीच्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. महापालिकेची पूर्ण तयारी होती. पण महापालिकेवर जे बसले होते त्यांची महापालिका पूर्ण लुटायची तयारी होती. त्यांची गडबड पाहून 2023 -24 लाच मी सांगितलं की हा घोटाळा आहे. महापालिकेतील अधिकारी काम करतात पण काँन्ट्रॅक्टर पळून जातात. 15 जानेवारी 2023 ला मी रस्त्याचा घोटाळा समोर आणला होता. 2024 चं टेंडरही तसंच होतं. आताही अधिवेशनात नगरविकास मंत्री पाच मिनिटात बेठकीतून पळून गेले. त्या बैठकीत सत्ताधारी आमदार ही सांगत होते की जिथे जिथे नारळ फोडले तिथे काम तर सुरू करा. आम्हीही सांगितले की पावसाळ्याआधी रस्त्याची कामं पूर्ण करा. डेडलाईन जवळ आली म्हणून थुकपट्टी करून चालणार नाही. काम कुठल्या दर्जाचे झाले आहे ते पाहायला हवा. अँधेरीचा डीएन नगर मार्ग तिसऱ्यांदा खोदून ठेवलाय. नगरविकास मंत्री त्यांचे खिसे भरले आहेत पण रस्त्तात माल भरला नाहिए. ठाण्यातील कोपरी पुल सहा महिन्यात फुटायला लागलाय. जशी एसंशि गटाची क्वालिटी तशीच रस्त्याची क्वालिटी झालीय”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
कोरटकरच्या जामिनामुळे स्पष्ट झालंय की भाजप असताना काहीही बोललेलं चालू शकतं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की, ”मुख्यमंत्र्यांच्या जवळचे तसेच आवडते असल्यामुळे हे सर्व चालतंय. यातून त्यांनी देशाला एक मेसेज दिलाय की तुम्ही छत्रपतींचा, महात्मा फुलेंचा महापुरुषांचा, अपमान करू शकता आणि भाजपचं सरकार असेल तर सर्व काही चालू शकेल., असे आदित्य ठाकरे म्हणाले.
जगभरातील देशांमध्ये अमेरिकेने लागू केलेल्या टॅरिफवर चर्चा सुरू आहे. त्याच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार यावर बोललं जात आहे पण आमचे सरकार यावर बोलत नाही. ते हिंदू मुसलमानांवर बोलतायत. महागाई, टॅरिफ, अर्थव्यवस्थेवर बोलायचं सोडून फक्त हिंदू मुस्लिमावर चर्चा सुरू आहे, अशीही टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List