महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे भाजपवर बरसले
अहमदाबादमधील काँग्रेसच्या 84 व्या अधिवेशनाला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून भाजपवर मोठा आरोप केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा झाल्याचे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
आतापर्यंत कुठे बघिलं नाही आणि ऐकलंही नाही. महाराष्ट्रात भाजप 150 जागांवर निवडणूक लढते आणि 138 जागा जिंकते. 90 टक्के निकाल लागला. या देशात कधी झालंय? अनेक निवडणुका आम्ही पाहिल्यात. मी स्वतः १२-१३ निवडणूक लढलोय. असं कधी नाही घडलं जो घोटाळा महाराष्ट्रात झाला. लोकशाही संपवण्यासाठी आणि विरोधकांचा पराभव करण्यासाठी भाजपने हे काम केलं आहे. या विरोधात आपल्याला लढायचं आहे.
…तर नरेंद्र मोदी देश विकून निघून जातील; मल्लिकार्जुन खरगे यांचा निशाणा
तुम्ही अशी टेक्निक बनवली आहे की, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि विरोधी पक्षांचे नुकसान होईल. अशी टेक्नॉलॉजी बनवून आमचा पराभव करत असाल तर आज ना उद्या या देशाचे तरुण आवाज उठवतील आणि बॅलेट पेपरवर निवडणूक हवी, ईव्हीएम नको, अशी मागणी करतील.
दलित, मुस्लिम, ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली, राहुल गांधी यांची कबुली
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List