पंतप्रधान मोदी अवतार, खासदार कंगना रनौतचे विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य मनुष्य नाहीत, ते तर अवतार आहेत असे विधान भाजप खासदार कंगना रनौतने केले आहे. तसेच मोदी पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशात विकास सुरू झाला असेही रनौत म्हणाल्या.
एका सभेत बोलताना कंगाना रनौत म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य मनुष्य नाहीत, ते तर अवतार आहेत. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हापासून राजकारण बदललं. 2014 च्या पूर्वी आपण तर मतदानही नाही करायचो. तरुणांना राजकीय नेत्यांबाबत राग निर्माण झाला होता. 2014 पूर्वी सगळे मिळून देश खात होते, पण आता अशी वेळ आली आहे की आपण स्वतः राजकारणात आलो आहोत. आता आपल्याकडे मोदींसारखा पंतप्रधान आहे, मोदी आल्यापासून देशाचा विकास सुरू झाला असेही रनौत म्हणाल्या.
Every word from Kangana Ranaut Screams why Kulwinder Kaur’s slap was spot on
pic.twitter.com/JeeCRknM0d
— Jitesh (@Chaotic_mind99) April 8, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List