आमिरच्या आयुष्यात आलेली ही सुंदरी कोण? एक हाक देताच त्याच्याजवळ धावत आली
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या चित्रपटांपेक्षाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. त्याचे घटस्फोट आणि अफेअर यामुळे तो चर्चेत असतो तसेच त्याला ट्रोलही केलं जातं. काही दिवसांपूर्वीच त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबद्दल चर्चा रंगल्या होत्या. तसेच त्यांच्यात असलेल्या वयाच्या फरकामुळे त्याला ट्रोलही करण्यात आलं.
सुंदरी ठरतेय चर्चेचा विषय
दरम्यान आमिर खानने आपल्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या नवीन गर्लफ्रेंडला सर्वांसमोर आणलं होतं. तिचं नाव गौरी स्प्रेट असून, दोघे मागील दीड वर्षांपासून डेट करत आहेत. गौरी आमिरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते.मात्र, या सगळ्या गॉसिपदरम्यान, आमिरची सुंदरीही चर्चेचा विषय ठरली आहे.
आमिर खान त्याच्या आयुष्यातील याच सुंदरीमुळे चर्चेत आला आहे
आमिर खान त्याच्या आयुष्यातील याच सुंदरीमुळे चर्चेत आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या आयुष्यात ‘सुंदरी’नावाची खास एंट्री झाली आहे. या ‘सुंदरी’चं आमिरवर आणि आमिरचं तिच्यावर एवढं प्रेम आहे की त्याच्या एका हाकेत त्याच्याजवळ धावत आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ही सुंदरी कोण?
तर ही सुंदरी कोण आहे आमिर खानची पाळीव श्वान. म्हणजे त्यांने सांभाळलेली कुत्री. आमिर खानचा पाळीव श्वानाचं नाव सुंदरी आहे. ईदच्या दिवशी आमिर जेव्हा आपल्या घराबाहेर चाहत्यांना भेटत होता, तेव्हा सुंदरीही त्याच्या सोबत होती. व्हिडीओमध्ये दिसतं असल्याप्रमाणे, सुंदरी गेटच्या बाहेर जात होती, पण आमिरने एक हाक मारताच ती धावत त्याच्याजवळ लगेच परत आली. यावरून आमिर आणि सुंदरी यांचं नातं किती खास आहे, हे यावरून स्पष्ट होतं. या क्यूट मुव्हमेंटने चाहत्यांचीही मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आमिर खानने कुटुंबासोबत साजरी केली ईद
ईदच्या निमित्ताने आमिर खानने आपल्या दोन्ही मुलांसोबत, जुनैद आणि आझादसोबत सण साजरा केला. आमिरने त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वत: स्वागत केलं. आमिर आणि त्याची दोन्ही मुलं पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसले, तिघांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ईदच्या दिवशी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे, आमिरच्या दोन्ही एक्स पत्नी किरण राव आणि रीना दत्ताही त्याच्यासोबत होत्या. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन सेलिब्रेशन करत असल्याचं पाहून चाहत्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List