Disha Salian Case: दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्या नाही तर, पूर्वनियोजित मर्डर? ‘ते’ पेनड्राईव्ह, गँगरेप आणि हत्येचा दावा

Disha Salian Case: दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्या नाही तर, पूर्वनियोजित मर्डर? ‘ते’ पेनड्राईव्ह, गँगरेप आणि हत्येचा दावा

Disha Salian Case: मुंबईच्या दोन माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही माजी पोलीस आयुक्तांनी निलेश ओझा यांना दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित एक पेनड्राईव्ह दिला आहे. या भेटीवेळी दिशा सालियनचे वडील सतीश सालियनदेखील तिथे होते, अशी माहिती देखील समोर येत आहे.

ए. पी. निपुंगे आणि भीमराज घाडगे या दोन माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील निलेश ओझा यांना पेनड्राईव्ह दिल्याची माहिती आहे. या पेनड्राईव्हमध्ये दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित माहिती असल्याचा दावा केला जातोय. संबंधित पेनड्राईव्हमध्ये फोटो, व्हिडीओ रेकॉर्डिंग, स्टिंग ऑपरेशन फुटेज आणि इतर महत्त्वाचे दस्तावेज असल्याची चर्चा आहे.

हे सर्व पुरावे मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर आरोपींच्या विरोधात असल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर, दिशाच्या हत्येला आत्महत्येचं रुप देण्यासाठी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देखील फेरफार करण्यात अल्याचा पुरावा पेनड्राइव्हमध्ये आहे… असं देखील सांगण्यात येत आहे.

या पेनड्राईव्हमुळे दिशा सालियन प्रकरणात काही नवे खुलासे होतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी लवकरच पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार असून, त्यात हे पुरावे समोर येणार आहेत. सध्या सर्वत्र दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी – दिशाचे वडील

ठाकरेगटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि अन्या आरोपींची देखील नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी दिशाच्या वडील सतीश सालियन यांनी केली आहे. ‘मी स्वतःच्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. या प्रकरणी जे साक्षीदार आहे त्यांना सुरक्षेची गरज आहे.

शिवाय सीन रिक्रिएशनची देखील मागणी केली आहे. कारण दिशा 25 फूट खाली उभ्या असलेल्या कारवर पडली नाही तर, कार शेजारी पडली होती. बिल्डिंच्या छतावरुन पडली असती तर ती 25 फूट लांब कशी पडली असती. असं होऊच शकत नाही. हे नियोजित कट आहे…’ असं देखील दिशा सालियनचे वडील म्हणाले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

VIDEO: सलमान खानच्या चाहत्यांनी कहर केला; थेट थिएटरमध्येच  फोडले फटाके, व्हिडीओ व्हायरल VIDEO: सलमान खानच्या चाहत्यांनी कहर केला; थेट थिएटरमध्येच फोडले फटाके, व्हिडीओ व्हायरल
ईदच्या एक दिवस आधी प्रदर्शित झालेला सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट अनेकांना आवडला आहे. सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांच्या...
Google Pay, युपीआय सेवा जगभरात ठप्प; युजर्सचा उडाला गोंधळ
BCCI ची मोठी घोषणा; वर्षाच्या शेवटी दोन दिग्गज संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार, वेळापत्रक जाहीर
Jalana News लग्नानंतर सहा महिन्यातच सुनेने काढला सासूचा काटा, मात्र शेजाऱ्याने पाहिल्याने व्हावे लागले फरार
पूनम गुप्ता यांची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती, 3 वर्षांचा असेल कार्यकाळ
Waqf Board Amendment Bill 2025 – तुमचा हेतू जमीन हडपण्याचा, न्याय देण्याचा नाही; अरविंद सावंत यांनी सरकारला धरलं धारेवर
‘विरोधकांनी छातीवर हात ठेवून…’; फडणवीस आक्रमक, वक्फ संशोधन विधेयकावर पहिली प्रतिक्रिया